घरमनोरंजनसनीचा 'हा' प्रँक सनीवरच उलटला

सनीचा ‘हा’ प्रँक सनीवरच उलटला

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दुसऱ्यावर प्रँक करण्यासाठी गेलेल्या सनीचा दाव तिच्यावर उलटला.

पार्नस्टारहून बॉलीवूड अभिनेत्री बनलेली सनी लियोनी ही इंटरनेटवर चर्चेत असते. चित्रपटांच्या सेटवर सनीसोबत अनेकजण प्रँक खेळतांना दिसतात. यावेळी सनीचा एक प्रँक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सनी सेटवरील एका व्यक्तीवर प्रँक करायला जाते मात्र तिच्यावरच हा प्रँक उलटतो. सनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेरअ केला आहे. आपल्यावर प्रँक केल्याबद्दलही तिने आनंद व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये सनी स्विमिंगपूल शेजारी नाचताना दिसत आहे. नाचता नाचता सनीने एका को स्टारला पूलमध्ये ढकलले. मात्र सनीच्या मागच्या मुलीने तिलाच स्विमिंगपूलमध्ये ढकलून दिले.

- Advertisement -

सनीचे मल्याळम चित्रपटात प्रवेश करत आहेत. तिचा आगामी चित्रपट ‘रंगीला’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनी मागील काही दिवसापासून या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. मागील काही महिन्यांपूर्वी सनीचा असाच एक प्रँक व्हायरल झाला होता.

 

View this post on Instagram

 

Shooting the first song for @rangeela_movie such a cool back drop!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -