घरमहाराष्ट्रफेसबुक स्टेट्स जीवावर बेतले; चाकणमध्ये तरुणाचा खून

फेसबुक स्टेट्स जीवावर बेतले; चाकणमध्ये तरुणाचा खून

Subscribe

फेसबुक स्टेटस ठेवण्याच्या रागावरून उदभवलेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण परिसरात शुक्रवारी रात्री आठ जणांच्या टोळक्याने १९ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून केला आहे. तर या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. प्रशांत बिरदवडे अस खुन झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेत जखमी असलेल्या पियुष धाडगे याचा खून करण्यासाठी ही टोळी आली होती. मयत प्रशांत ने काही महिन्यापूर्वी फेसबुक स्टेट्सवर जे ‘डोक्यात आहेत त्यांना सुट्टी नाय घोडा लावन, तो पण पद्धतशीर भूलो मत बदला अभि बाकी है.’ अस स्टेट्स ठेवलं होतं त्यामुळे त्याच्यावर सर्वांचा राग होता. या रागातूनच त्याचा खून करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान घटने नंतर एका आरोपीला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वैमनस्यातून केली हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी पियुष धाडगे (वय-१९) याचे आणि मुख्य आरोपी आकाश राजाभाऊ शिंदे यांचे एक वर्षांपूर्वी समर्थ कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये भांडण झाले होते. गेल्या एक वर्षभरापासून दोघांमध्ये यावरून राग होता.
पियुष हा आपला खून करणार असल्याची माहिती आकाशाला मित्र अक्षय लोमटे मार्फत मिळाली तत्पूर्वी त्याचा आपण काटा काढायचा अस ठरलं. मित्रांना सोबत घेऊन त्याने कट रचला, तळेगाव चाकण रोडवर प्रशांत आणि पियुष असल्याची माहिती मिळाली. तिथे दोन दुचाकीवर मुख्य आरोपी आकाश राजाभाऊ शिंदे, पांग्या लांडगे, बफन लांडगे, प्रथमेश जाधव, अक्षय लोमटे, बाब्या राजगुरू, लंगडा, हर्षल खराबी यांनी दुचाकी त्यांच्या दुचाकीला अडवली लावत थेट दोघांवर कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडके यांनी मारहाण करण्यास सुरू केले.

- Advertisement -

मारहाणीत झाला मृत्यू

जखमी पियुष त्यांच्या तावडीतून निसटला परंतु प्रशांत मात्र सापडला त्याच्यावर सपासप वार केले, कारण त्याच्यावर देखील सगळ्यांचा राग होता त्याने अक्षय लोमटेला याअगोदर मारहाण केली होती तसेच काही महिन्यांपूर्वी फेसबुक स्टेट्स आरोपीवर ठेवलेले होते. हल्ल्यात प्रशांत चा मृत्यू झाला आहे. घटनेप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार हे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -