घरमनोरंजनप्रीतम कागणेचा डॅशिंग लुक दिसणार 'अहिल्या' चित्रपटात

प्रीतम कागणेचा डॅशिंग लुक दिसणार ‘अहिल्या’ चित्रपटात

Subscribe

अहिल्या हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात आयपीएस झालेल्या एका महत्त्वाकांक्षी महिला पोलिस अधिकाऱ्याची एक रंजक कथा आहे. ह्या चित्रपटात प्रीतम कागणे ही अभिनेत्री एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

हलाल, ३१ ऑक्टोबर आणि संघर्षयात्रा या चित्रपटांतील उत्तम अभिनयानंतर प्रीतम कागणे ‘अहिल्या’ या चित्रपटात पुन्हा एकदा दिसणार आहे. या चित्रपटात ती एका डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्रचंड कष्ट करून आयपीएस झालेल्या एका महत्त्वाकांक्षी महिला पोलिस अधिकाऱ्याची रंजक कथा अहिल्या चित्रपटात मांडण्यात आली आहे. पोलिसाच्या या खास भूमिकेसाठी प्रीतम हिने बुलेट चालवण्यापासून ते खडतर पोलिसाचे जगणे कसे असते याचे दोन महिन्यांचं प्रशिक्षणही घेतलं आहे. अहिल्या चित्रपटाबरोबरच प्रीतमचा ‘मान्सून फुटबॉल’ हा मराठी, हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटातील इतर कलाकार

‘अहिल्या’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन राजू पार्सेकर यांनी केलं असून सुधीर चारी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर नितीन तेंडुलकर यांच्या गीतांना प्रवीण कुंवर यांनी संगीतबद्ध केलं आहे. या चित्रपटात प्रीतमसह प्रिया बेर्डे, रोहित सावंत, अमोल कागणे, प्रमोद पवार, नूतन जयंत, निशा परूळेकर अशी उत्तम स्टारकास्ट आहेत.

- Advertisement -

आव्हान होतं बुलेट शिकणं…

पोलिस अधिकाऱ्याची भूमिका यापूर्वी कधी केलेली नाही. अहिल्या चित्रपटाने ती संधी मला मिळाली आहे. पोलिसांच्या जगण्याचे विविध कंगोरे या भूमिकेला आहेत. या भूमिकेसाठी फिजिकल फिटनेस वाढवणं आवश्यक होतं. त्यामुळे ती त्यानुसार फिटनेस करण्यास सुरुवात केली. या चित्रपटाच्या निमित्ताने सायकलिंग, स्वीमिंग, कराटे खेळायला शिकले. तसेच दोन महिन्यामचं खडतर पोलिस प्रशिक्षण देखील घेतलं. या चित्रपटातील पोलिसाच्या भूमिकेसाठी बुलेट शिकणे गरजेचे होते. त्यामुळे बुलेट शिकण्यास सुरुवात केली. बुलेट शिकताना चार-पाच वेळा धडपडलेही. मात्र, हार न मानता बुलेट चालवायला शिकले. त्यामुळे या भूमिकेला जीवंत करता आलं. या चित्रपटासाठी मीही खूप उत्सुक आहे.  – प्रीतम कागणे, अभिनेती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -