प्रेग्नेंट आलियाचे ‘डार्लिंग’च्या प्रमोशन दरम्यानचे फोटो होतायत व्हायरल

दरम्यान, आता आलिया तिच्या प्रेग्नंसीचा आनंदासोबतच आगामी चित्रपट 'डार्लिंग'च्या प्रमोशनसाठी सुद्धा पोहोचलेली दिसत आहे. या फोटोतील आलियाचं बेबी बंप दिसू लागलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. एप्रिलमध्ये रणबीर कपूरसोबत लग्न झाल्यानंतर आलिया आता आई होणार असल्याची घोषणा तिने केली होती. तेव्हापासून आलिया आणखी चर्चेत आली आहे. सध्या आलिया गरोदर असली तरी ती चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त आहे. मागील काही दिवसांपूर्वी आलिया हॉलिवूडच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये होती आणि नुकत्याच काही दिवसांपूर्वी ती मुंबईमध्ये परतली आहे.

दरम्यान, आता आलिया तिच्या प्रेग्नंसीचा आनंदासोबतच आगामी चित्रपट ‘डार्लिंग’च्या प्रमोशनसाठी सुद्धा पोहोचलेली दिसत आहे. या फोटोतील आलियाचं बेबी बंप दिसू लागलं आहे. डार्लिंगच्या प्रमोशनमधील आलियाचे फोटो आता व्हायरल होऊ लागले आहेत. सोबतच तिने घातलेला ड्रेस सुद्घा चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

याव्यतिरिक्त आलिया सध्या तिच्या ‘रॉकी और रानी की प्रेम’ कहानीच्या शूटिंगमध्ये सुद्धा व्यस्त आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग मुंबईमध्ये सुरू असून शूटिंग दरम्यान आलियाला स्पॉट करण्यात आलं आहे. यावेळी आलिया तिचं बेबी बंप लपवताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @bollywoodarab.fc2

याआधी, सुद्धा आलियाच्या बेबी बंपचे काही फोटो व्हायरल झाले होते. हे फोटो आलिया हॉलिवूडच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटाचं शूटिंग दरम्यानचे होते.

या चित्रपटात दिसणार आलिया
आलिया येत्या काळात पती रणबीर कपूर सोबत ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच ती ‘डार्लिंग’, ‘रॉकी और रानी की प्रेम’,हॉलिवूडच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.


हेही वाचा :विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेच्या ‘लायगर’ चित्रपटाचं ट्रेलर रिलीज