घरमनोरंजनपृथ्वीकने शेअर केला प्राजक्ताबरोबर ऑस्ट्रेलियातून व्हिडीओ

पृथ्वीकने शेअर केला प्राजक्ताबरोबर ऑस्ट्रेलियातून व्हिडीओ

Subscribe

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. यामधील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना आपलासा वाटतो. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली. परदेशातील प्रेक्षकांना सुद्धा या कार्यक्रमाची तुफान क्रेझ आहे. त्यामुळे हास्यजत्रेची टीम अनेकदा परदेश दौऱ्यावर जाऊन तेथील प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. गेल्यावर्षी ही संपूर्ण टीम अमेरिका दौऱ्यावर गेली होती. आता यंदाच्या वर्षी महाराष्ट्राला खळखळून हसवणारे हे विनोदवीर ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार ऑस्ट्रेलियातून अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. अशातच सध्या प्राजक्ता माळी व पृथ्वीक प्रतापच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अभिनेता पृथ्वीक प्रतापने प्राजक्ता माळीबरोबरचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये प्राजक्ता पृथ्वीकचा हात पकडते आणि मग दोघं एकत्र चालताना दिसत आहेत. या व्हिडीओमागे शाहरुख खानचं ‘मैं कोई ऐसा गीत गाऊं हे’ गाणं लावलं आहे.

- Advertisement -

प्राजक्ता व पृथ्वीकच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “मला फक्त त्रास होतोय हा रील पहिल्यापासून.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “एक पॅकेट फरसाण गिफ्ट म्हणून दिल्यावर प्राजक्ता.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “पण मी का जळतोय त्याच्यावर” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “मग कर्जतचं फार्म हाऊस तुझा झाला असं समजायचं का?” अशा अनेक मजेशीर कमेंट्स प्राजक्ता व पृथ्वीकच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्राची टीम गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियात आहे. ऑस्ट्रेलियात विविध ठिकाणी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा लाइव्ह’ हा कार्यक्रम सादर केला जातो आहे. या दरम्यान संपूर्ण टीम मजेशीर रील्स आणि फोटोही शेअर करतेय. टीमने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला भेट दिल्याचा व्हिडिओही प्राजक्ताने शेअर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -