घरताज्या घडामोडीRBI Alert : तुमचे खाते सुरक्षित आहे का? आरबीआयचा सर्व बँकांना इशारा

RBI Alert : तुमचे खाते सुरक्षित आहे का? आरबीआयचा सर्व बँकांना इशारा

Subscribe

मागील काही काळापासून सातत्याने सरकारी संस्थांसह खासजी संस्थांवर मोठ्याप्रमाणात सायबर हल्ले होत असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता बँकाही सायबर हल्ल्याच्या रडारवर असून भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.

मागील काही काळापासून सातत्याने सरकारी संस्थांसह खासजी संस्थांवर मोठ्याप्रमाणात सायबर हल्ले होत असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता बँकाही सायबर हल्ल्याच्या रडारवर असून भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. सायबर हल्ल्यांमुळे निर्माण होण्याचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे आदेशही आरबीआयकडून इतर बँकांना देण्यात आले आहे. तसेच, ग्राहकांचा आणि इतर गोष्टींचा विचार करायला हवा, असेही आदेश आरबीआयकडून देण्यात आलेले आहेत. (rbi alert several banks for cyber risks improve security)

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर टी रबी शंकर यांनी काही दिवसांपूर्वी बँकांवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांबाबत माहिती दिली होती. त्यानुसार, “बँकिंग क्षेत्राला नवीन सायबर सुरक्षा धोक्यांसाठी तयार राहण्याची गरज आहे. ग्राहकांचा आणि इतर गोष्टींचा विचार करायला हवा”, असे टी रबी शंकर म्हणाले होते. शिवाय, AI च्या गैरवापराचे धोके ओळखण्यासाठी आणि कमी करण्यासाठी बँकांना त्यांच्या एनक्रिप्टेड सिस्टमची पुनर्रचना करावी लागेल. आपल्याला AI मधील समस्या देखील समजून घेणे आवश्यक आहे”, असेही त्यांनी सांगितले होते.

- Advertisement -

मागील काही काळात बँकिंग प्रणालीमध्ये सायबर सुरक्षा हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली. डिजिटल बँकिंग वाढल्याने सायबर हल्ल्यांचे धोकेही वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयकडून हा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सायबर हल्ला टाळणयासाठी सायबर आणि आयटीचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याची गरज असून CSight अंतर्गत, RBI ची तपासणी पथक सर्व बँकांच्या IT प्रणालीची तपासणी करत असल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आलेली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने लोकपाल योजनांतर्गत आलेल्या तक्रारींबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बँकेच्या कामकाजाशी संबंधित तक्रारी अधिक असल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ एका वर्षात बँकांनी त्यांच्या कामात कोणतीही सुधारणा केलेली नाही. या अहवालानुसार, 2022-23 मध्ये लोकपाल योजनांतर्गत आरबीआयकडे दाखल झालेल्या तक्रारींमध्ये 68 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. म्हणजेच यावेळी एकूण तक्रारींची संख्या 7 लाखांहून अधिक झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Electoral Bonds : मजूर ते ‘लॉटरी किंग’…सँटियागो मार्टिनचा अविश्वसनीय प्रवास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -