घरमनोरंजनप्रियाकांचा पुन्हा 'पहिला नंबर' !

प्रियाकांचा पुन्हा ‘पहिला नंबर’ !

Subscribe

'देसी गर्ल' प्रियांकाच्या चोप्राच्या नावावर एक नवा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. प्रियांकाच्या या विशेष अचिव्हमेंटमुळे ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

देसी गर्ल प्रियांका चोप्राने बॉलीवूडसोबतच, हॉलीवूडमध्येही आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. प्रियांकाने भारताचं नाव संपूर्ण जगात मोठं केलं आहे. क्वांटिको मधील एफ.बी.आय. ऑफिसरपासून ते बाजीराव मस्तानी मधील मराठमोळ्या काशीबाईपर्यंत प्रियांकाने नेहमीच तिच्या अभिनयातील वेगळेपण दाखवलं आहे. आपल्या दर्जेदार अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी पिगी चॉप्स सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते. विशेषत: इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह राहणारी प्रियांका या माध्यमातून तिच्या खासगी आणि व्यावयायिक आयुष्यातील घडामोडी चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. प्रियांका आणि तिचा कथित बॉयफ्रेंड निक जोन्स यांचं नातं प्रकाशझोतात आलं तेही ‘इन्स्टाग्राम’मुळेच. प्रियांकाने इन्स्टावर वेळोवेळी टाकलेल्या निक्ससोबतच्या फोटोंमुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं. नुकताच प्रियांकाच्या चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. प्रियांकाच्या या विशेष अचिव्हमेंटमुळे ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

‘इन्स्टाग्राम’ पे छा गये…

प्रियांकाने नुकताच एक नवा रेकॉर्ड कायम केला आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी प्रियांका आता इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी भारतीय अभिनेत्री ठरली आहे. प्रियांकाच्या इन्स्टाग्रामवरील चहत्यांची संख्या २५ दशलक्ष अर्थात २ कोटी ५० लाख इतकी झाली आहे. यामुळे प्रियांका सर्वाधिक Insta फॉलोअर्स असलेली नंबर वनची भारतीय अभिनेत्री ठरली आहे. याबाबत प्रियांकाने तिच्या चाहत्यांचे आभार मानत नुकताच एक फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -
Priyanka chopra instagram
सौजन्य-इन्स्टाग्राम

प्रियांका पाठोपाठ सर्वाधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्स असलेले भारतीय सेलिब्रीटी –

  • दीपिका पदुकोण – २४.९ दशलक्ष (दुसरा)
  • विराट कोहली- २२.७ लाख (तिसरा)
  • आलिया भट्ट- २२.७ दशलक्ष (चवथा)
  • श्रद्धा कपूर – २१.७ दशलक्ष (पाचवा)


बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण

हॉलीवूडमध्ये आपली दमदार छाप पाडल्यानंतर आता प्रियांका बॉलीवूडमध्ये परतणार असल्याची जोरदार चर्चा आहे. प्रियांकाने बॉलीवूडचे काही चित्रपट साईन केल्याचंही बोललं जात आहे. सलमान खानच्या भारत आणि ह्रतिक रोशनच्या क्रिश ४ या दोन नव्या सिनेमात प्रियांका काम करणार असल्याचं जवळजवळ नक्की झालं आहे. प्रियांकाचे भारतीय चाहते तिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असणार यात काहीच शंका नाही. याआधी बाजीराव मस्तानी हा प्रियांकाचा बॉलीवूडमधील शेवटचा चित्रपट होता. सध्या अमेरिकेमध्ये परतलेली प्रियांका आता पुन्हा मायदेशी कधी परतणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -