घरमहाराष्ट्रAjit Pawar : मोदी ऐंशीच्या पुढे गेल्यावर त्यांनाही विचारू; पटोलेंच्या टीकेला अजितदादांचे...

Ajit Pawar : मोदी ऐंशीच्या पुढे गेल्यावर त्यांनाही विचारू; पटोलेंच्या टीकेला अजितदादांचे उत्तर

Subscribe

आज 18 जानेवारी रोजी मुंबईत अजित पवार गटाचा महिला निर्धार महिला आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर मीडियाशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाना पटोले यांनी दिलेल्या आव्हानाबाबत विचारण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘नानाला म्हणा तू किती पार्ट्या फिरून आला, कशाला आम्हाला शिकवतो.

मुंबई : राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. यातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये वाद रंगला आहे. नाना पटोलेंनी अजितदादांना मोदींचं वय विचारण्याची हिंम्मत दाखवावी असे आव्हान दिलं होतं. त्याला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोलेंचा ऐकेरी उत्तर देत मोदींही ऐंशीच्या पुढे गेले तर त्यांनाही वय विचारू असंही वक्तव्य अजित पवार यांनी केलं. (Ajit Pawar When Modi goes past eighty we will ask him too Ajitdads reply to Patoles criticism)

आज 18 जानेवारी रोजी मुंबईत अजित पवार गटाचा महिला निर्धार महिला आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर मीडियाशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाना पटोले यांनी दिलेल्या आव्हानाबाबत विचारण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘नानाला म्हणा तू किती पार्ट्या फिरून आला, कशाला आम्हाला शिकवतो. ज्या वेळी वय होईल त्यावेळी विचारू ना. 80 च्या पुढे गेल्यावर विचारू,’ असं घणाघाती प्रत्युत्तर अजित पवारांनी नाना पटोलेंना दिलं आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर आता भाजपकडून कशी प्रतिक्रिया येते हे पहावे लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Ayodhya Makeover : शरयू तीरावरी अयोध्या ‘गोकर्ण’निर्मित नगरी; रामलल्लाच्या नगरीचा मेकओव्हर करणारे मराठमोळे नितीन गोकर्ण

काय म्हणाले होते नाना पटोले

शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत अजित पवारांनी त्यांना निवृत्त व्हायचा सल्ला दिला होता. अजित पवारांच्या या सल्ल्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत निशाणा साधला होता. ‘अजित पवारांनी मोदींचे सुद्धा वय विचारलं पाहिजे, मग त्यांची हिंम्मत दिसेल. आपल्या काकांचं वय विचारण्यापेक्षा मोदी साहेबांचा वय विचारला पाहिजे’, असा टोला नाना पटोले यांनी लगावला होता. नाना पटोले यांच्या या टीकेवर अजित पवारांनी पलटवार केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : NCP : भाजपनंतर ‘दादां’च्या नेतृत्वाखालील पक्ष सर्वात मोठा; भुजबळांची शिंदे गटावर कुरघोडी!

छगन भुजबळांची शिंदे गटावर कुरघोडी?

आज (18 जानेवारी) राष्ट्रवादी (अजित पवार गट) महिला काँग्रेसच्यावतीने ‘निर्धार नारी शक्तीचा’ हे घोषवाक्य वापरत राज्यस्तरीय भव्य मेळावा षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी छगन भुजबळ यांनी शिंदे गटावर कुरघोडी करणारं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, हा पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मोठा आहे. निवडणूकीतून त्याचे मोजमाप होणार आहे. आपण कुठे आहोत हे ठरणार आहे. मागील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपनंतर दोन नंबरचा पक्ष अजित पवार यांचा होता हे राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत दाखवून दिले आहे. परंतु ताकद अजून वाढवावी लागेल असेही छगन भुजबळ म्हणाले. तेव्हा मंत्री छगन भुजबळ यांचा रोख कुणाकडे आहे. याबाबत आता चर्चा रंगत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -