घरमनोरंजनदेसी गर्लचा रंगपंचमीला देसी डान्स

देसी गर्लचा रंगपंचमीला देसी डान्स

Subscribe

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा प्रोफेशनल आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अनेकदा प्रियंकाचे तिच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रियंका आपल्या कुटुंबासोबत भारतात पोहोचली आहे. यंदाची रंगपंचमी देखील प्रियंकाने भारतातच साजरी केली. यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रियंकाचा देसी डान्स पाहाच

 

View this post on Instagram

 

A post shared by Patty Cardona (@jerryxmimi)

यंदाची रंगपंचमी प्रियंकाने आपल्या कुटुंबीयांसोबत भारतातच साजरी केली. यावेळचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात प्रियंका देसी स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियंका चोप्रासोबत तिचे मित्रही डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये प्रियंकाचा पती निक जोनस देखील दिसत आहे. तसेच यावेळी प्रियंकाची बहिण बिग बॉस फेम मनारा चोप्रा देखील प्रियंकासोबत धमाल करताना दिसत आहे.

- Advertisement -

‘या’ चित्रपटात दिसणार प्रियंका चोप्रा

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरीजमुळे चर्चेत होती. या वेबसीरीजनंतर आता प्रियंका चोप्रा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत.

 


हेही वाचा : Pooja Sawant : लग्नानंतरची पहिलीच धुळवड, पूजा सावंतने शेअर केले फोटो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -