घरताज्या घडामोडीMukhtar Ansari : माफिया मुख्तार अन्सारी ICU मध्ये दाखल; तुरुंगात स्लो पॉयझनिंगचा...

Mukhtar Ansari : माफिया मुख्तार अन्सारी ICU मध्ये दाखल; तुरुंगात स्लो पॉयझनिंगचा आरोप

Subscribe

माफिया डॉन मुख्तार अंसारी याची तुरुंगात अचानक तब्येत बिघडल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी स्लो पॉयझनिंग करत असल्याचा आरोप मुख्तारने केला होता. मात्र, अचानक तब्येत बिघडल्याने त्याला मेडिकल कॉलेजमधील आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश : माफिया डॉन मुख्तार अंसारी याची तुरुंगात अचानक तब्येत बिघडल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी स्लो पॉयझनिंग करत असल्याचा आरोप मुख्तारने केला होता. मात्र, अचानक तब्येत बिघडल्याने त्याला मेडिकल कॉलेजमधील आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. मुख्तार अन्सारी उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. (Mafia don Mukhtar Ansari admitted to ICU slow poisoning in prison)

मिळालेल्या माहितीनुसार, अचानक तब्येतीत बिघाड झाल्याने मुख्तार अन्सारी याला सोमवारी रात्री जिल्हा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितल्याने ताबडतोब त्याला मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले आहे. सद्यस्थितीत मुख्तारवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मुख्तारच्या तब्येतीवर जिल्हा प्रशासन, पोलीस, तुरुंग प्रशासन काहीच बोलण्यास तयार नाही. दोन दिवसांपूर्वीच मुख्तारच्या सुरक्षेवरून जेलर आणि दोन डेप्युटी जेलर यांना निलंबित करण्यात आले होते. शिवाय, मुख्तार काही दिवसांपासून युरिनल इन्फेकशनमुळे त्रस्त होता.

दरम्यान, मुख्तारने काही दिवसांपूर्वी स्लो पॉयझन दिले जात असल्याचा आरोप केला होता. 21 मार्चला कोर्टात त्याने वकिलांमार्फत हा आरोप केला होता. १९ मार्चला रात्री त्याला विषारी पदार्थ देण्यात आल्याचा आरोप त्याने केला होता. यामुळे त्याची तब्येत बिघडल्याचे त्याने म्हटले होते. यानंतर कोर्टाच्या आदेसानुसार दोन डॉक्टरांची टीम तुरुंगात गेली होती. तपासणीनंतर त्याचे रक्ताचे नमुनेही घेण्यात आले होते. या रिपोर्टनंतर त्याला काही औषधे देण्यात आली होती. मात्र, रोजा ठेवल्याने असे होत असल्याचे डॉक्टरांनी तुरुंग प्रशासनाला सांगितले होते. उपाशी राहिल्यानंतर अचानक जास्त खाल्ल्याने असे होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते.

- Advertisement -

हेही वाचा – ED : अनिल देसाईंचे पीए दिनेश बोभाटेंना ईडीचे समन्स, बेहिशेबी मालमत्ताप्रकरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -