Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनPooja Sawant : लग्नानंतरची पहिलीच धुळवड, पूजा सावंतने शेअर केले फोटो

Pooja Sawant : लग्नानंतरची पहिलीच धुळवड, पूजा सावंतने शेअर केले फोटो

Subscribe

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत हिचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला.28 फेब्रुवारीला सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधून पूजाने आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवलं आहे. थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर हे जोडपं ऑस्ट्रेलियाला गेलं आहे. हे दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अभिनेत्रीने परदेशातील धुळवडीची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

पूजाचा नवरा सिद्धेश चव्हाण सध्या कामानिमित्तानं ऑस्ट्रेलियात आहे. त्यामुळं पूजा देखील काही दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाला गेली आहे. यंदाची होळी तिनं तिथं साजरी केली. लग्नानंतरचा हा पूजाचा खरं तर पहिलाच सण. या होळी सेलिब्रेशनचे फोटो तिनं चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

 पूजा सावंत सासरच्या मंडळींसह ऑस्ट्रेलियातील होळी सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली आहे. याचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मराठमोळं ढोलपथक, रंगांची उधळण याची खास झलक पाहायला मिळत आहे. याशिवाय पूजाच्या दीराने देखील त्यांचा एकत्र मजा करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.ऑस्ट्रेलियातही धुळवडीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. अनेक भारतीय एकत्र येत हा सण साजरा करताना दिसतात. पूजा सावंतच्या कलरफूल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय.

pooja sawant celebrates holi in australia with husband

दरम्यान, पूजा आणि सिद्धेश यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती.पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण यांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं आहे. अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती शेवटची ‘मुसाफिरा’ चित्रपटामध्ये झळकली होती.