घरमहाराष्ट्रनाशकात सेना-भाजप युतीचे वारे!

नाशकात सेना-भाजप युतीचे वारे!

Subscribe

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारी (आज) नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे दोघंही एकाच व्यासपीठावर आल्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरे आणि पाटील यांचं एका मंचावर येणं हे भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं मोठं सूचक असल्याचं मानलं जात आहे. आज पिंपळगावात निवासी शाळेचं भूमिपूजन आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त हे दोनही दिग्गज नेते एकाच मंचावर आल्यामुळे  सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. निफाडमधील शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी पिंपळगावातील कन्या विद्यालाच्या पटांगणात  या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे आणि चंद्रकात पाटील यांच्यासह आरोग्यमंत्री दीपक सावंत, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पालकमंत्री गिरीश महाजन आणि न्यायमंत्री राजकुमार बडोले आदी उपस्थित होते.


वाचा: ‘प्रकाश आंबेडकर आमच्या टीममध्ये आले तर अध्यक्ष करु’

सध्या राज्यामध्ये भाजप आणि सेनेचे सरकार असूनही या दोन्ही पक्षांमध्ये कायमच शाब्दीक युद्ध रंगत असते. शिवसेनेने जरी स्वबळाचा नारा दिला असला तरी युती होणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जाहीरपणे सांगत आहेत. अशातच आता सेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे चंद्रकांत पाटील एकाच व्यासपीठर आल्याने नाशकात भाजप आणि सेनेची युती होणार का? याविषयी सर्वांची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, आमदार अनिल कदम यांचे प्रतिस्पर्धी असेलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनकर यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपळगावात, कदमांना यानिमित्ताने शक्तीप्रदर्शन दाखवण्याची संधी चालून आल्याचं बोललं जात होतं. निफाड मतदार संघात मागील १० वर्षांपासून शिवसेनेचीच सत्ता आहेत. गेल्या निवडणुकीतही भाजपच्या उमेदवाराला अनिल कदम यांनी १६ हजार मतांवर रोखले होते. भाजपच्या एका उमेदवारामुळे आमदार कदम यांना अक्षरश: शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये युती झाल्यास त्यामध्ये त्यांचा फायदा असल्याने या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.

- Advertisement -

पिंपळगाव बसवंत येथे आज झालेल्या या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी शाळेचे लोकर्पण करण्यात आले. याशिवाय पिंपळगाव-निफाड-सिन्नर रस्त्याचे भूमिपूजनही करण्यात आले. तसंच निफाड ते चांदवडमार्गाचे भूमिपूजन आणि क्रातीज्योती सावित्रिबाई फुले ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन हे कार्यक्रमही पार पडले.


वाचा: ‘भारत बनेल जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -