घरमनोरंजनराजकुमार राव लवकरच हॉलिवूडमध्ये दिसणार?

राजकुमार राव लवकरच हॉलिवूडमध्ये दिसणार?

Subscribe

एकापाठोपाठ हिट चित्रपट करत बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा राजकुमार राव हा लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचा खुलासा त्याने केला आहे.

आपल्या दमदार अभिनयाने अभिनेता ‘राजकुमार राव’ने अल्पवधीतच सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एकापाठोपाठ हिट सिनेमे करत सर्वाधिक मागणी असलेल्या अभिनेत्यापैकी राजकुमार राव ओळखला जातो. अनेक मोठमोठ्या बजेटचे हीट चित्रपट राजकुमारकडे आहे. इतकेच नाही तर त्याचे कित्येक चित्रपट ऑस्कर पर्यंत पोहोचले आहेत. नुकतच त्याच्या ‘व्हाइट टाइगर’ या चित्रपटला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. त्याने काम केलेला चित्रपट ऑस्करपर्यंत पोहोचल्यामुळे राजकुमार हा लवकरच हॉलिवूडमध्ये झळकण्याची शक्यता दिसत आहे. याबाबतचा खुलासा स्वत: राजकुमारने केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार म्हणाला होता की, ”मला खूप चांगल्या चित्रपटांची ऑफर मिळायला सुरुवात झाली आहे, मात्र अजून ही मी चांगल्या आणि अतिशय नाविन्यपूर्ण गोष्टींची वाट बघत आहे. राजकुमारला बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवण्याची इच्छा आहे. त्यासाठी तो हॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी फार उत्सुक आहे. त्यामुळे आता राजकुमारला त्याची इच्छा पूर्ण करण्याची संधी कोण देतो आणि कोणत्या हॉलिवूड सिनेमातून तो झळकेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. राजकुमार रावचा ‘रुही’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद दिला. राजकुमार आता त्याच्या आगामी ‘बधाई २’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर दिसणार आहे.

- Advertisement -

हे वाचा- फिटनेसप्रेमी मिलिंद सोमणला कोरोनाची लागण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -