घरमनोरंजनराखी सावंत आणि आदिलच्या लग्नाचे फोटो व्हायरल; मे 2022 मध्ये केलं होतं...

राखी सावंत आणि आदिलच्या लग्नाचे फोटो व्हायरल; मे 2022 मध्ये केलं होतं कोर्ट मॅरेज

Subscribe

मनोरंजन गोष्टीतील ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत सध्या विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे. नुकतीच राखी ‘मराठी बिग बॉस’ या कार्यक्रमातून बाहेर आली. त्यानंतर तिने तिच्या आईचे हॉस्पिटलमधील काही फोटो शेअर करत आईला ब्रेन ट्यूमर असल्याचे सांगितले. दरम्यान, अशातच आता राखीने आणखी एक खुलासा केला आहे. राखीने तिचा बॉयफ्रेंड आदिलसोबत लग्न केल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

या फोटोंमध्ये राखी आणि आदिल यांच्या गळ्यात फुलांचा हार घातला असून दोघांनी मॅरेज सर्टिफिकेट हातात घेऊन फोटो काढला आहे. हे फोटो पाहुन राखीचे चाहते आश्चर्यचकित झाले असून तिला शुभेच्छा देत आहेत.

- Advertisement -

मे 2022 मध्ये झालं राखी आणि आदिलचं लग्न

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

मागील काही महिन्यांपासून राखी आणि आदिल सतत चर्चेत असतात. अनेकदा विविध ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट करण्यात येतं. तसेच दोघे अनेकदा सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबूली देखील देत असतात. परंतु हे फोटो आत्ता व्हायरल होत असले तरी हे फोटो सहा महिन्यांपूर्वीचे आहेत. 29 मे 2022 रोजी राखी आणि आदिलने कोर्ट मॅरेज केलं.

- Advertisement -

दरम्यान, राखीचं हे दुसरं लग्न आहे. याआधी राखीने रितेश सोबत लग्न केलं होतं. परंतु त्याचं आधी एक लग्न झाल्याचे कळताच राखीने त्याच्या सर्व सबंध तोडले.

 


हेही वाचा :

‘नाटू नाटू’ने पटकावला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’; शाहरुखसहित बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -