घरमनोरंजन'संजू' जाणार आता चीनला

‘संजू’ जाणार आता चीनला

Subscribe

चीनमध्ये यापूर्वी 'दंगल' आणि 'बजरंगी भाईजान' प्रदर्शित झाला असून या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच 'संजू'देखील चीनमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

भारतामध्ये बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर आता रणबीर कपूर अभिनीत संजय दत्तच्या जीवनावरील आधारित ‘संजू’ चीनसह इतर देशात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनुसार, हा चित्रपट भारतात २९ जूनला ४१०० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला. आतापर्यंत या चित्रपटानं भारतामध्ये ३०० कोटीपेक्षादेखील अधिक कमाई केली आहे. फॉक्स स्टारनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजूनही हा चित्रपट भारतामध्ये तुफान चालला आहे. या चित्रपटानं रणबीरच्या करिअरलादेखील एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे.

चीनच्या वितरकांकडून विचारणा

“चीनच्या बऱ्याच वितरकांनी या चित्रपटासाठी संपर्क साधला आहे. त्यांनी हा चित्रपट पाहिला आहे आणि त्यामुळं हा चित्रपट त्यांच्या देशातही प्रदर्शित व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. तसंच हा चित्रपट जपान, दक्षिण कोरिया आणि अन्य देशातही प्रदर्शित करण्यात यावा अशी आमची योजना आहे.” असं फॉक्स स्टार स्डुडिओच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंह यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

याआधी ‘दंगल’ आणि ‘बजरंगी भाईजान’ प्रदर्शित

चीनमध्ये यापूर्वी ‘दंगल’ आणि ‘बजरंगी भाईजान’ प्रदर्शित झाला असून या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. या दोन्ही चित्रपटांनी चीनमध्येदेखील चांगली कमाई केली आहे. भारतीय चित्रपटांसाठी चीनचं मार्केट सध्या चांगला पर्याय म्हणून समोर आलं आहे. ‘संजू’ चित्रपटाचे निर्माता विधु विनोद चोप्रा असून राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दरम्यान या चित्रपटात परेश रावल, मनिषा कोईराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा आणि विकी कौशल यांच्याही प्रमुख भूमिका असून सर्वांचा अभिनय यामध्ये वाखाणण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -