घरताज्या घडामोडीनीरज चोप्रासोबत रजनीकांत यांचे कनेक्शन काय आहे? रणदीप हुड्डाने सांगितले

नीरज चोप्रासोबत रजनीकांत यांचे कनेक्शन काय आहे? रणदीप हुड्डाने सांगितले

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा अशा कलाकारांपैकी एक आहे जे डोळ्यांनी बोलतात आणि जे न बोलता बरेच काम करतात. रणदीपला बॉलिवूडमध्ये नॅचरल Actor म्हणून ओळखले जाते. रणदीप हुड्डाने कमी चित्रपटात काम करून
खूप लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे त्याने अभियनाच्या जोरावर अल्पावधीत बॉलिवूड ते हॉलिवूडचा प्रवास केला आहे. रणदीप अभिनयापुरती मर्यादित राहत नसून तो सोशल मीडियावरून अनेक घडामोडींवर आपली मत मांडत असतो. नुकतंच त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आणि दाक्षिणात्य सुपरस्टार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचे मजेशीर कनेक्शन सांगितले आहे.

अभिनेता रणदीप हुड्डाने एक ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये रजनीकांत यांचा फोटो आहे. ज्यावर लिहिले आहे की, ‘जर तुम्ही नीरज, नीरज, नीरज ओरडलात तर तुम्हाला रजनी, रजनी, रजनी ऐकू येईल. आता तुम्हाला यातील सीक्रेट समजले असेल. रजनीकांत सर्वत्र आहे.’

- Advertisement -

सध्या रणदीप हुड्डाचे हे मजेशीर ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सध्या याच ट्वीटची चर्चा सुरू असून खूप लाईक्स मिळत आहे. आतापर्यंत ३ हजारांहून अधिक लाईक्स रणदीप हुड्डाच्या ट्वीटला मिळाले आहेत. बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टाने रणदीप हुड्डाच्या पोस्टवर कमेंट करताना लिहिले आहे की, ‘Ohhhh मॅन, याला काहीच शब्द नाही.’

- Advertisement -

तसेच जेव्हा नीरज चोप्राने ऑलिम्पिकमधले सुवर्ण पदक जिंकेल तेव्हा रणदीपने लिहिले होते की, ‘खैंच राख्या सै मीटर नीरज चोप्रा. आपण पदकाचा सर्वात मायावी रंग जिंकला आहे, असं वाटत आहे.’


हेही वाचा – ‘पॉलीअमॉरी’ संकल्पनेवरील ‘सोप्पं नसतं काही’ वेबसीरिज ३१ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -