घरक्रीडाViral Video: नीरज चोप्राचा देसी अंदाज सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Viral Video: नीरज चोप्राचा देसी अंदाज सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Subscribe

सध्या सोशल मीडियावरही नीरजच्या नावाच डंका आहे.

भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचत भारताला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. नीरजने ८७.५८ मीटर अंतराची नोंद करत सुवर्णपदकाची कमाई केली.भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावून देणारा नीरज चोप्रावर सध्या सर्व स्तरावरुन स्तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे. इतकचं नाही तर त्याने केलेल्या दमदार कामगिरी बद्दल स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन संवाद साधत नीरजला शुभेच्छा दिल्या. सध्या नीरज यशाच्या उंच शिखरावर विराजमान झाला आहे. सोशल मीडियावर तर नीरजच्या नावाचीच चर्चा होतं आहे. ऑलिम्पिक मधील फोटो व्हिडिओ,मॅसेज,स्टेटस व्यतीरिक्त नीरजचा एक जुना व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच नेटकऱ्यांची या व्हिडिओला तुफान पसंती मिळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये नीरजच्या साधेपणाचे फार कौतुक करण्यात येत आहे.तसेच आपल्या भाषेबद्दल असलेलं प्रेम देखील या व्हिडिओतून झळकत आहे.

काय आहे व्हिडिओ मध्ये-

- Advertisement -

भारतासाठी यंदाची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा खरचं ऐतिहासीक ठरली. नीरजने सुवर्ण पदक जिंकत देशाची मान उंचावली यानंतर नीरज चोप्राच्या चाहत्यांमध्ये देखील तुफान वाढ झाली असून सध्या सोशल मीडियावरही नीरजच्या नावाच डंका आहे. नीरजचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. @TajinderBagga या सोशल मीडिया यूजरने नीरजचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडिओ 54 सेकंदाचा असून व्हिडिओमध्ये नीरजचा देसी अंदाज दिसून येत आहे. एका इव्हेंट दरम्यान नीरजने हजेरी लावली आहे .अगदी सुट-बुट या डॅशिंग लूकमध्ये नीरज दिसतोय त्यावेळ एक होस्ट येऊन नीरजला इंग्रजी भाषेत प्रश्न विचारतो. की “तुम्ही जैवलिनची (भालाफेक)सुरूवात कशी केली? आम्हाला सुद्धा याबद्दल काही सांगा?” नीरज हसत समोरील होस्टला बोलतो सर हिंदीमध्ये विचारा यानंतर होस्ट हिंदीमध्ये प्रश्न विचारतो. होस्ट नीरजची हेयरस्टाईल पाहून त्याला पुन्हा एक प्रश्न विचारतो “तुझ्या हेयरस्टाईल मागची प्रेरणा कोण आहे- शाहरुख की ईशान शर्मा?”  यानंतर नीरज म्हणतो, “कोणीच नाही मी स्वत:आहे.” सध्या सोशल मीडियावर गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राच्या या देसी स्टाईलची प्रचंड चर्चा होत आहे.

- Advertisement -

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया-


हे हि वाचा – Neeraj Chopra: सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रासाठी भारत सरकारने केला तब्बल सात कोटी रुपयांचा खर्च

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -