घरताज्या घडामोडीMTV Roadies: असं काय झालं म्हणून १८ वर्षांनंतर रणविजय सिंहने केला...

MTV Roadies: असं काय झालं म्हणून १८ वर्षांनंतर रणविजय सिंहने केला रोडिजला अलविदा

Subscribe

रणविजय सिंहने शोला अलविदा केल्याने आता सीझन १९ मध्ये रणविजयच्या जागी कोण दिसणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्याचप्रमाणे १८ वर्षांच्या प्रवासानंतर रणविजय सिंहने रोडिजने का सोडला असा प्रश्न देखील त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

एम टिव्हीवरील प्रसिद्ध शो रोडिज ( MTV Roadies)  मधील परिचित चेहरा आता प्रेक्षकांना पाहता येणार नाहीये. तब्बल १८ वर्षांनी अभिनेता आणि विजे रणविजय सिंहने (Ranvijay Singh)  रोडिज या रिअँलटी शोला अलविदा म्हटले आहे. एक स्पर्धक त्यानंतर निवेदक आणि आता थेट मेंटोर म्हणून रणविजय सिंहने रोडिजमध्ये आपले हक्काचे स्थान मिळवले होते. रोडिजच्या ४ मेंटोर पैकी रणविजय सिंह अनेक स्पर्धकांचा लाकडा मेंटोर होता. मात्र सर्वांचा लाडका रणविजय सिंह आता एमटीव्हीच्या रोडीज सीझन १९ मध्ये दिसणार नाही. रणविजय सिंहने शोला अलविदा केल्याने आता सीझन १९ मध्ये रणविजयच्या जागी कोण दिसणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्याचप्रमाणे १८ वर्षांच्या प्रवासानंतर रणविजय सिंहने रोडिजने का सोडला असा प्रश्न देखील त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

कोण करणार रणविजय सिंहला रिप्लेस?

- Advertisement -

एचटीच्या रिपोर्टनुसार, रोडिज १९मध्ये रणविजयची जागा अभिनेता सोनू सूद घेणार आहे. सोनू सूद यावेळी रोडिजचा १९वा सीझन होस्ट करणार आहे त्याचप्रमाणे तो मेंटोर म्हणून देखील भूमिका बजावणार आहे. याआधी अभिनेत्री नेहा धूपिया,प्रिंस नरुला आणि अनेक मेंटोर्स शो सोडून निघून गेले होते त्यामुळे आता शोमधील गँग लीडर्स ही संकल्पना बंद केल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. आता सोनू सूद रणविजयची भूमिका कशी पार पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे सोनू सूट रोडिजमध्ये दिसणार असल्याने त्याचे चाहते मात्र भलतेच उत्साही झाले आहेत. रोडिज १९ चे शुटींग साउथ आफ्रिकेत होणार आहे.

रणविजयने का सोडला शो?

रणविजयने रोडिज शो का सोडला असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत अनेक कारणे समोर आली. रिपोर्टनुसार, रणविजयने म्हटले आहे की, मी रोडिजच्या आगामी सीझनमध्ये दिसणार नाही. माझ्या प्रवासात एमटीव्हीचा फार मोठा वाटा आहे. एमटीव्ही माझ्या आयुष्यात मजबूत स्तंभासारखा उभा आहे. त्यामुळेच मी माझ्या मनासारखे काम करू शकलो. रोडिजच्या या सीझनमध्ये दोन्ही साइडने काही गोष्टी सेट होऊ शकल्या नाहीत त्यामुळे या सीझनमध्ये दिसणार नाही.

- Advertisement -

चॅनेल सोबत वादवादी झाल्याने चॅनेलने रणविजयला बाहेरचा रस्ता दाखवला असे म्हटले जात आहे मात्र या अफवा असून त्यावर स्पष्टीकरण देत रणविजयने म्हटले की, मी मागच्या १८ वर्षांपासून चॅनेलसोबत काम करत आहे. चॅनेलसोबत मी अनेक शो केले. प्रॉडक्शन आणि आमच्यात कोणतेही वाद झालेले नाहीत. रोडिजच्या या सीझनमध्ये आमच्या डेट्स मॅच होऊ शकल्या नाहीत त्यामुळे हा सीझन मी करत नाहीये.


हेही वाचा –  Gangubai Kathiawadi trailer आधीच आला अजय देवगणचा लूक, म्हणाला- येतोय आम्ही

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -