घरमहाराष्ट्रअजित पवारांच्या संगतीत उद्धव ठाकरे बिघडले; ह.भ.प कराडकरांचं टीकास्त्र

अजित पवारांच्या संगतीत उद्धव ठाकरे बिघडले; ह.भ.प कराडकरांचं टीकास्त्र

Subscribe

महाविकास आघाडी सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर विरोधकांकडून सतत टीका केली जात असतानाच आता ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संगतीत राहून बिघडलेत असा अप्रत्यक्ष टोला बंडातात्या कराडकरांनी लगावला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्वी तसे नव्हते मात्र आता या महाविकास आघाडीत आल्यामुळे ते बिघडलेत.” असं म्हणत कराडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ढवळ्या नी पोवळ्या अशी उपमा दिली आहे. ”ढवळ्या शेजारी बांधला पोवळ्या” ही म्हण बोलत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ‘ढवळ्या’ आणि उपमुख्यमंत्री पवार यांना ‘पोवळा’ म्हटले आहे.

“ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वान नाही पण गुण लागला. उद्धव ठाकरे चांगला माणूस आहेत. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या आणि हिंदुह्रदयसम्राट अशी पदवी मिळवणाऱ्या बाळासाहेब ठाकरे या पुढाऱ्यांचे उद्धव ठाकरे मुलगा आहेत. दारूला परवानगी मात्र मंदिरे, सप्ते, वाऱ्या बंद कराव्या अशा विचारांचे उद्धव ठाकरे नाहीत. पण ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या. हा ढवळ्या म्हणजे अजित पवार. अजित पवारांच्या संगतीत उद्धव ठाकरे बिघडले.” असा आरोप ह.भ.प. बंडातात्या कराडकरांनी केला आहे.

- Advertisement -

राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. यात आज साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांत्या नेतृत्त्वाखाली व्यवसनमुक्ती संघटनेने दंडवत आणि दंडूका असे आंदोलन केले. यावेळी बंडातात्या कराडकरांनी राज्यातील सर्व नेत्यांची मुलं दारू पितात असा आरोप केला. मात्र या आरोपांमुळे आता बंडातात्या कराडकर महाविकास आघाडीच्या रडारवर येण्याती शक्यता वर्तवली जात आहे.


अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी योजनांचा अभाव अन् कारभाऱ्यांना अधिक भाव, आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -