घरमनोरंजनरॅम्प वॉक करताना रणवीरने केलं दीपिकाला किस; व्हिडीओ व्हायरल

रॅम्प वॉक करताना रणवीरने केलं दीपिकाला किस; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने नुकत्याच आयोजित केलेल्या फॅशन शोमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये आलिया आणि रणवीरने एकत्र रॅम्प वॉक केला. यावेळी आलिया आणि रणवीरच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. दरम्यान, त्यानंतर रणवीर सिंह सोलो रॅम्प वॉक देखील केला. यादरम्यान, एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण रणवीरचं कौतुक करताना दिसत आहेत.

रणवीरने जिंकली चाहत्यांची मने

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमधील व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रणवीरने नेहमीप्रमाणे हटके देसी लूक केला होता. या वेळी तो रॅम्प वॉक करत असताना मध्येच थांबून दीपिकाकडे जातो आणि तिच्या गालावर किस करतो. त्यानंतर तो दीपिकाच्या शेजारी बसलेल्या आईच्या पाया पडतो. रणवीरच्या कृत्याने तिथे बसलेले सर्वजण भारावून जातात आणि टाळ्या वाजवतात. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यावर कमेंट्स करुन अनेकजण रणवीरचं कौतुक करताना दिसत आहेत.

- Advertisement -

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार रणवीर

सध्या रणवीर त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंहचा हा चित्रपट 28 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. यात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन सारखे स्टार्स देखील दिसणार आहेत.


हेही वाचा :

Manipur Violence : परिस्थिती आम्हा महिलांना…. मणिपूर घटनेवर बॉलिवूड अभिनेत्रींचा संताप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -