घरताज्या घडामोडीरश्मिका मंदानाची 80 लाखांची फसवणूक, जवळच्या व्यक्तीनंच गंडवल्यानं उचललं मोठं पाऊल

रश्मिका मंदानाची 80 लाखांची फसवणूक, जवळच्या व्यक्तीनंच गंडवल्यानं उचललं मोठं पाऊल

Subscribe

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा ( Rashmika Mandanna ) अॅनिमल (Animal ) हा सिनेमा लवकरच येणार आहे. या सिनेमात रश्मिका रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार रश्मिका मंदानाची 80 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये फसवणूक करणारी दुसरी-तिसरी कुणीही व्यक्ती नसून हे तिच्या अगदी जवळची व्यक्ती आहे. ही व्यक्ती तिची मॅनेजर आहे. रश्मिकाला याविषयी कळताच तिने मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकले.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून मॅनेजर रश्मिकाचं काम पाहत आहे. ती रश्मिकाच्या मागे लपूनछपून पैशांची चोरी करत होती. हे समजताच रश्मिकाला मोठा धक्का बसला आहे. मात्र तिला हे प्रकरण प्रकाशझोतात आणायचं नसल्याने ती शांत आहे.

- Advertisement -

रश्मिका मंदाना सध्या रणबीर कपूरसोबत तिचा आगामी चित्रपट अॅनिमलमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच, निर्मात्यांनी चित्रपटाचा प्री-टीझर देखील रिलीज केला आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. तसेच हा सिनेमा 11 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटांसोबतच रश्मिका तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. ‘अर्जुन रेड्डी’ फेम अभिनेता विजय देवरकोंडाशी तिचं नेहमीच नाव जोडलं जातं. मात्र या दोघांनी त्यावर कधीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

- Advertisement -

हेही वाचा : ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा टीझर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -