घरमनोरंजनसई, मेघा आणि पुष्करचं 'रियुनियन'

सई, मेघा आणि पुष्करचं ‘रियुनियन’

Subscribe

बिग बॉस मराठीमध्ये सध्या मैत्रित फूट पडल्याचा ट्रॅक सुरू आहे. मात्र लवकरच जुन्या मित्रांमध्ये नव्याने याराना होताना दिसणार आहे. सई, मेघा आणि पुष्कर यांच्यात पुन्हा मैत्री होताना दिसणार आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून ‘बिग बॉस’ घरात सुरू असलेला मेघा आणि पुष्करमधील वाद अखेर संपुष्टात येण्याची शक्यता आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीजनच्या ‘ग्रँड फिनाले’साठी अवघे तीन आठवडे शिल्लक राहिले आहेत. तेव्हा शत्रूलाही मित्र बनवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या घरातील सदस्यांची जुन्या मित्रांशी नव्याने गट्टी जमलेली पाहायला मिळणार आहे. बिग बॉसचे तीन तगडे स्पर्धक सई, मेघा आणि पुष्कर यांची रियुनियन होताना दिसणार आहे.

गैरसमज होणार दूर

काही दिवसांपासून मेघा, सई आणि पुष्कर यांच्या मैत्रीमध्ये वादाची ठिणगी पडली होती. पुष्कर आणि मेघा एकमेकांचे ऐकून घ्यायलाही तयार नव्हते. परंतू, कितीही भांडण, गैरसमज झाले तरी देखील ते मिटवून पुढे जाणे हे अनिवार्य असते. मेघा, सई आणि पुष्कर यांच्यामधील वाद विकोपाला गेले, त्यांच्यामध्ये बरीच भांडण झाली, मतभेद झाले, आरोप लावले गेले आणि त्यामुळे आता मेघा बरोबर असलेली पुष्कर – सईची मैत्री तुटते की काय असे वाटत होते. मात्र जुने मित्र – मैत्रिणी फारकाळ दूर राहू शकत नाहीत. त्यामुळे आजच्या एपिसोडमध्ये या तिघांमध्ये पुन्हा मैत्री होताना पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

‘पैसा फेक तमाशा देख’

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता फक्त सात सदस्य उरले आहेत. शेवटचे काही आठवडे उरल्यामुळे हा गेम खूप कठीण होत जाणार आहे. सगळ्याच स्पर्धकांमध्ये आता अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी चुरस रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचे बक्षिस तब्बल २५ लाख रुपये असणार आहे. हाच आजच्या एपिसोडचा टास्क असणार आहे. सदस्यांना त्या बक्षिसातील हिस्सा स्वत:साठी मागायचा आहे. ‘पैसा फेक तमाशा देख’ असे या टास्कचे नाव ठेवण्यात आले आहे. कार्यानिमित्त घरामध्ये बैल गाडी ठेवण्यात असून सर्व सदस्यांना १४ व्या आठवड्याकडे नेणारी ही बैलगाडी आहे. आता सदस्यांचे काय धोरण काय असेल ? कोण वाचेल ? कोण नॉमिनेट होईल हे पाहणे औस्त्युक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -