घरमनोरंजनह्युंडाई फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सलमान खान सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

ह्युंडाई फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सलमान खान सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

Subscribe

६८व्या ह्युंडाई फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार सोहळ्याची तारीख आणि रुपरेषा जाहीर करण्यात आली आहे. ६ दशकांची परंपरा असलेल्या या नामांकीत पुरस्कार सोहळ्यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान करण्यात येतो. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाचे सौजन्य लाभणार आहे हे विशेष. २०२२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे. या फिल्मफेअर पुरस्काराची माहिती देण्यासाठी मुंबईमध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला अभिनेता सलमान खान, वर्ल्डवाईड मीडिया लिमिटेडचे सीईओ दीपक लांबा, ह्युंडाई मोटरचे सीओओ तरुण गर्ग आणि फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई ही मान्यवर मंडळी हजर होती.

महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सौजन्याने आयोजित करण्यात येणाऱ्या 68 व्या फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार हा अत्यंत दिमाखदार, देखणा आणि भव्यदिव्य स्वरुपाचा असणार आहे. अभिनेता सलमान खान हा पहिल्यांदाच फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालकन करताना दिसणार आहे. अभिनेता मनीष पॉल हा सहसूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे. हा पुरस्कार सोगळा २७ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आला असून, हा कार्यक्रम वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्डकन्व्हेन्शन सेंटर इथे होणार आहे. या कार्यक्रमात अभिनेता विकी कौशल, अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस यांचे बहारदार परफॉर्मन्सही ठेवण्यात आले आहेत. या देखण्या कार्यक्रमाचा याची देही याची डोळा आनंद घेता यावा यासाठी प्रेक्षकांसाठी तिकीट विक्री लवकरच सुरू होणार आहे.

- Advertisement -

६८व्या ह्युंडाई फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण २८ एप्रिल रोजी कलर्स वाहिनीवर रात्री ९वाजता केले जाणार आहे. या कार्यक्रमातील काही खास क्षण, पडद्यामागच्या गंमती आणि इतर अनेक गोष्टी फिल्मफेअरच्या वेबसाईटवर आणि सोशल मीडियावर पाहायला मिळू शकतील.

वर्ल्डवाईड मीडिया लिमिटेडचे सीईओ दीपक लांबा यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रतिक्रिया देताना म्हटले की, “सहा दशकांच्या दीर्घ प्रवासात भारतीय चित्रपटसृष्टीवर प्रेम करणाऱ्या मंडळींकडून मिळालेले प्रेम आणि आदर पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. हे प्रेम असेच वृद्धींगत होत राहावे या उद्देशाने आम्ही दरवर्षी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी एका दिमाखदार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करत असतो. आम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की, फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमुळे आपल्या सगळ्यांना आयुष्यात काही अविस्मरणीय क्षण आले आहेत जे आयुष्यभर स्मरणात राहतील. या पुरस्कार सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीला नवा आयाम देणाऱ्या दिग्गजांचा सत्कार केला जातो, आणि ही परंपरा आम्ही जपण्याचा प्रयत्न करत आहोत. ह्युंडाई मोटर्स आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्या प्रमुख सौजन्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. ”

- Advertisement -

 


हेही वाचा : 

‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेनी गाठला ५०० भागांचा टप्पा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -