घरमनोरंजनरसभरीला सिरिजमध्ये पहिला मान

रसभरीला सिरिजमध्ये पहिला मान

Subscribe

हिंदी चित्रपटामध्ये छान बस्तान बसले आहे म्हटल्यानंतर कोणी कलाकार छोट्या पडद्यासाठी काम करायला मागत नव्हता, पण त्यातही लोकप्रियता आणि पैसा आहे म्हटल्यानंतर जवळजवळ सर्वच कलाकारांनी या छोट्या पडद्याला आपलेसे केलेले आहे. आता या स्टार कलाकारांमध्ये कोणत्या गोष्टीचे आकर्षण असेल तर ते सिरिजचे. आता या सिरिजमध्ये नावाजलेले कलाकार सहभागी होत आहेत, त्यामुळे जागतिक पातळीवर महोत्सवाचे आयोजन करणार्‍या आयोजकांना सिरिज महोत्सवाचेसुद्धा आयोजन करणे गरजेचे वाटू लागलेले आहे. सिरिज मॅनिया इंटरनॅशनल फेस्टीव्हल हा त्यापैकी एक आहे ज्यात भारतातून प्रथमच रसभरी या सिरिजची निवड झालेली आहे.

फ्रान्स, सिंगापूर, कॅनडा, डेन्मार्क, अर्जेंटीना, स्पेन या जगभरातल्या देशांबरोबर भारताचीही सिरिज या महोत्सवात दाखल झालेली आहे. याचा आनंद सर्वांत जास्त कोणाला झाला असेल तर यात मुख्य भूमिका साकारणार्‍या स्वरा भास्करला. तिने यात इंग्रजी शिक्षिकेची व्यक्तीरेखा साकार केलेली आहे. तिच्यासोबत रश्मी अगदेकर, प्रद्युम्न सिंग, निलू कोहली, चित्तरंजन त्रिपाठी यांच्या यात भूमिका आहेत. तन्वीर बुकवाला याची ही निर्मिती असून, निखिल नागेश भट याने त्याचे दिग्दर्शन केलेले आहे. रसभरी ही सिरिज डिजिटलली पाहता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -