घरमनोरंजनशाहरुख खान लेक आर्यनसाठी नव्या बॉडीगार्डच्या शोधात, मन्नतपासून दूर ठेवण्याचा प्लॅन

शाहरुख खान लेक आर्यनसाठी नव्या बॉडीगार्डच्या शोधात, मन्नतपासून दूर ठेवण्याचा प्लॅन

Subscribe

मुंबई क्रूझ ड्रग्जप्रकरणातून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची आर्थर रोड तुरुंगातून जामीनावर सुटका झाली आहे. आर्यन तुरुंगातून बाहेर येताच शाहरुख खान आणि गौरी खान त्याच्या आरोग्य आणि संरक्षणाबाबत पूर्वीपेक्षा अधिकच जागरुक झाले आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात गेल्याने शाहरुख आणि गौरी खूप अडचणीत सापडले होते. मात्र आता मुलगा आर्यन घरी परतल्यानंतर दोघांनीही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे, ज्यामाध्यमातून ते आर्यनला अधिक सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

आर्यनसाठी नव्या बॉडीगार्डच्या शोधात

आता शाहरुख खान आणि गौरी खान आर्यनसाठी पर्सनल बॉडीगार्ड ठेवण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती समोर आली आहे. शाहरुख खानसोबत त्याचा बॉडीगार्ड रवी सिंह नेहमीच सावलीसारखा असतो. आता आर्यन खानसोबतही स्वतःचा पर्सनल बॉडीगार्ड असेल. ज्यासाठी आता शाहरुख खान नव्या बॉडीगार्डचा शोध घेत आहेत. एका सूत्राच्या हवाल्यानुसार, ‘या संपूर्ण घटनेमुळे शाहरुख पूर्ता अस्वस्थ झाला आहे. आर्यनसोबत स्वतःचा बॉडीगार्ड असता तर कदाचित ही गोष्ट घडली नसती. असा विचार शाहरुख खान करतोय. तसेच रवीप्रमाणे त्याने आर्यनची काळजी घेतली असती. त्यामुळे शाहरुखने लवकरात लवकर आर्यनसाठी बॉडीगार्ड ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

आर्यन खानला मन्नतपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

शाहरुख खान दिवाळीनंतर मुलगा आर्यन खानला मन्नतपासून दूर ठेवण्याचा विचार करत आहे. ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आर्यन खानला विशेष न्यायालयात पासपोर्ट जमा करावा लागला होता. त्यामुळे आर्यन खान परवानगीशिवाय मुंबई किंवा भारताबाहेर जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत शाहरुख खान आर्यनला त्याच्या अलिबाग फार्महाऊसवर शिफ्ट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आर्यन खानसाठी ऑक्टोबर महिना खूप कठीण गेला आहे. यामुळे शाहरुख आणि गौरीची इच्छा आहे की, आर्यन खानला मीडियापासून ब्रेक मिळावा आणि त्याने स्वतःवर लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे आर्यन खानला दिवाळीनंतर अलिबागला पाठवले जात आहे. शाहरुख खानचे अलिबागमध्ये आलिशान फार्महाऊस आहे. अशा परिस्थितीत आर्यनने आपल्यासोबत झालेल्या घटना विसरण्यासाठी अलिबागमध्ये राहावे अशी शाहरुखची इच्छा आहे.

- Advertisement -

शाहरुख डिसेंबरमध्ये पुन्हा करणार कामाला सुरुवात

आर्यनच्या अटकेमुळे शाहरुख खानने आपल्या सर्व प्रोजेक्टवरील काम थांबवले होते. पठाण आणि दिग्दर्शक ऍटली यांचा चित्रपटाचे शूटिंग त्याने मध्येच थांबवले. त्यामुळे शाहरुख खान आता डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कामावर रुजू होणार आहे. सध्या शाहरुख कुटुंबासोबत दिवाळी साजरी करणार आहे. यानंतर संपूर्ण कुटुंब आर्यन खानसोबत काही काळ अलिबागमध्ये राहणार आहे. शाहरुखने काम सुरू केल्यानंतर गौरी खान आणि धाकटा मुलगा अबराम आर्यनसोबत अलिबागमध्ये राहणार आहेत.


Video : जपानमध्ये ‘जोकर’ च्या वेशात व्यक्तीचा ट्रेनमध्ये हल्ला, १७ प्रवासी जखमी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -