घरमनोरंजन'या'साठी शिल्पा झाली ट्रोल

‘या’साठी शिल्पा झाली ट्रोल

Subscribe

सेलिब्रिटी आपल्या सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. काही पोस्टला पसंती मिळते. तर काही पोस्ट ट्रोल होतात. सध्या बॉलीवूडची फिटनेस फ्रिक दिवा शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. पण हे ट्रोलिंग तापदायक नसून शिल्पाची किंमत आणखी वाढवणारं आहे.

असा झाला विआनचा वाढदिवस

- Advertisement -

साधारणत: सेलिब्रिटींचे वाढदिवस हे फाईव्ह स्टार हॉटेल्स, आलिशान रिसॉर्टमध्ये साजरे केले जातात. नुकताच शिल्पाचा मुलगा विआन सहा वर्षांचा झाला. साहजिकच शिल्पा हा वाढदिवस हटके करणार असे वाटणे स्वाभाविक आहे. पण शिल्पाने विआनचा हा सहावा वाढदिवस हटके पद्धतीने साजरा केला. त्यासंदर्भातलाच एक व्हिडिओ इन्स्टावर व्हायरल झाला आहे. शिल्पा तिचा नवरा राज कुंद्रा, मुलगा विआन आणि शिल्पाची आई एका वृद्धाश्रमात हा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. विआन आणि शिल्पा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना मिठाई वाटून त्यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहे.

शिल्पावर नेटिझन्सची स्तुतीसुमने

- Advertisement -

सोशल पोस्टवरुन सेलिब्रिटींना ट्रोल करणे हल्ली काही नवे नाही. एखादी पोस्ट आवडली नाही की, नेटीझन्स लगेचच त्या सेलिब्रिटीला टार्गेट करतात. पण शिल्पाच्या या व्हिडिओने तिच्या चाहत्यांना एकदम खूश केलं आहे. त्यामुळे शिल्पाच्या या पोस्टवर नेटिझन्सनी स्तुतीसुमने उधळली आहेत.

(सौजन्य- इन्स्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -