घरमहाराष्ट्रकर्जतच्या त्या ७ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही

कर्जतच्या त्या ७ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही

Subscribe

तांत्रिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांवर देखरेख करणारी सर्वोच्च संस्था म्हणजेच ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) नियमांचे उल्लंघण करणाऱ्या देशाभरातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालयांना नोटीसा पाठविल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १० महाविद्यालये असून कर्जतच्या ७ महाविद्यालयांचा समावेश आहे. सदर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान आणि शिक्षकांचे रखडलेले पगार यांमुळे एआयसीटीईने या नोटीसा बजावल्या आहेत. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात या सातही महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापासून रोखण्यात आले आहे.

सरस्वती एज्युकेशन सोसायटी या संस्थेकडून चालविल्या जाणाऱ्या कर्जतच्या सात महाविद्यालयांवर प्रवेशबंदीचा आदेश एआयसीटीईने दिला आहे. या महाविद्यालयात अभियांत्रिकी, व्यवस्थापन व वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. ही महाविद्यालये कर्जत आणि भिवपुरी येथे आहेत. या महाविद्यालयांमध्ये प्रवेश करुन विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सरस्वती एज्युकेशन सोसायटीने महाविद्यालयात काम करणाऱ्या १५ हजार शिक्षक आणि इतर पदावरील कर्मचाऱ्यांना गेल्या २० महिन्यांपासून पगार दिलेला नाही. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले आहे.

- Advertisement -

वेतन न झाल्यामुळे या महाविद्यालयाच्या शिक्षकांनी एआयसीटीई जवळ तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एआयसीटीईच्या अधिकाऱ्यांनी कर्जतच्या या महाविद्यालयांना भेट दिली. त्याचबरोबर एआयसीटीने महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागाला कारणे दाखवे नोटीस दिली आहे, ज्यामध्ये वेतन न देण्यामागचे कारण स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहे.

मुंबई विद्यापीठाने या प्रकरणी चौकशी जाहीर केली आहे. त्याचबरोबर त्या सात महाविद्यालयातील काही शिक्षकांची जवळच्या महाविद्यालयांमध्ये तात्पूरती बदली करण्यात आली आहे. परंतु, शिक्षक संघटनांनी मुंबई विद्यापीठावर नाराजगी व्यक्त केली आहे. शिक्षक आंदोलनाचे प्रमुख वैभव नारवाडे यांनी मुंबई विद्यापीठ बघ्याची भूमिका कशी घेऊ शकते असा प्रश्न लगावला आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -