घरमनोरंजनअभिनेत्री श्रद्धा कपूरला झाला डेंग्यू

अभिनेत्री श्रद्धा कपूरला झाला डेंग्यू

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरला डेंग्यूची लागण झाली असून सध्या सुरु असलेल्या सायना नेहवाल्या बायोपिकच्या चित्रीकरणाला त्यामुळे ब्रेक लागला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या आजाराने त्रस्त झाली आहे. तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्यावर बनणाऱ्या बायोपिकच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धाची प्रकृती बरी नसल्याचे समोर आले होते. तपासणीनंतर तिला डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. डॉक्टरांनी तिला पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. श्रद्धा विश्रांती घेत असताना चित्रपटाचे दिग्दर्शक बालकलाकारांसोबत सायनाच्या लहानपणीचा भाग चित्रित करणार आहेत.

बॅडमिंटनचाही करतेय सराव 

काही दिवसांपूर्वी सायना नेहवाल हिच्या बायोपिकमधील श्रद्धा कपूरचा लूक प्रसिद्ध झाला होता. तिच्या या लूकला पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले होते. यामध्ये ती हुबेहूब सायनासारखी दिसत होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करत असून याचे चित्रीकरण सुरू झाले आहे. या बायोपिकसाठी श्रद्धा भरपूर मेहनत घेत असून ती बॅडमिंटनचा सराव करत आहे. त्यासोबत ती फिजिओथेरेपीचे सेशनही घेणार आहे. बॅडमिंटनच्या सरावादरम्यान मसल्स हट्ट होऊ नये अथवा तिला दुखापत होऊ नये, यासाठी हे सेशन उपयोगी ठरणार आहे.

- Advertisement -

सायनाचे आयुष्य सुंदर आहे

श्रद्धा कपूर या भूमिकेसाठी हाय प्रोटीन डाएट घेत असून गोड खाण पूर्णपणे सोडणार आहे. यामुळे ती एका एथलिकसारखी दिसू शकणार आहे. श्रद्धाने सायनाच्या पालकांचीही भेट घेतली आहे. आपल्या भूमिकेबाबत बोलताना श्रद्धा म्हणाली, ‘आतापर्यंत मी बॅडमिंटनचे ४० क्लासेस घेतले आहेत. या दरम्यान जाणवले की हा खेळ खुपच कठिण आहे. मी या खेळाला खुपच एंजॉय करतेय. सायनाचे आयुष्य खुपच सुंदर आहे. त्यामुळे तिची भूमिका पडद्यावर साकारताना मला खुप आनंद होत आहे’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -