घरमनोरंजन'मी स्वत: अनेक चित्रपट गमावले' सोनाक्षीने 'आऊटसायडर्स' कलाकारांवर साधला निशाणा

‘मी स्वत: अनेक चित्रपट गमावले’ सोनाक्षीने ‘आऊटसायडर्स’ कलाकारांवर साधला निशाणा

Subscribe

बॉलिवूडची दबंगगर्ल अर्थात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या चित्रपटांपासून जरी दूर असली तरी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोनाक्षी वेगवेगळ्य माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. सोनाक्षी सिन्हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. मात्र सोनाक्षीने आज बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे, तिच्या स्पष्टवक्तेपणामुळ देखील तिला विशेष ओळखले जाते. त्यामुळे नेहमीच तिच्या वक्तव्यांची जोरदार चर्चा राहते. मात्र सध्या ती एका वेगळ्या कारणासाठी चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतंच तिने एका मुलाखतीत बॉलिवूडमधील स्टार किड्सची बाजू घेत आऊटसायडर्स कलाकारांवर टीका केली आहे.

या मुलाखतीत तिला स्टार किड्सबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावर तिने अगदी सडेतोड उत्तरे दिली आहेत. सोनाक्षी यावेळी म्हणाली की, बहुतांश स्टार किड्सला अनेक चित्रपट हातातून गमवावे लागले. मी स्वत: देखील अनेक चित्रपट गमावले आहे. हा माझ्या नोकरीतील एक भाग आहे. त्यामुळे स्टार किड्सबद्दल चर्चा करणे चुकीचे आहे. त्यांनीही त्यांच्या आयुष्यात अनेक संकटं पाहिलीत. यात एवढाच फरक असतो की ते कोणाकडे रडायला जात नाही,”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

- Advertisement -

प्रत्येक स्टार किड्सच्या बाबत ही गोष्ट नक्कीच होते. फक्त या गोष्टीला सामोरे जाता आलं पाहिजे आणि यालाच जीवन असे म्हणतात. त्यामुळे सांडलेल्या दुधाबद्दल बोलण्यात काहीही अर्थ नाही असा निशाणाही सोनाक्षीने साधला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

- Advertisement -

यावर बोलताना सोनाक्षी पुढे म्हणाली की, ‘माझा विषय सोडा, माझे वडील जे स्टार किड्स नव्हते. तरीही त्यांनाही अनेक चित्रपट गमवावे लागलेत. हा अनुभव सर्वच कलाकारांना येतो. हा कामाचा एक भाग आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात पुढे चालत राहा. मेहनत चालू ठेवा,’ असही सोनाक्षी म्हणाली.

सोनाक्षीने ‘दंबंग’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर अक्षय कुमारच्या राउडी राठोड, सन ऑफ सरदार या चित्रपटातही ती झळकली. तिचे हे तीनही चित्रपट चांगलेच गाजले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -