घरमनोरंजनमासे खाल्ल्याने सोनू निगम आयसीयूत दाखल

मासे खाल्ल्याने सोनू निगम आयसीयूत दाखल

Subscribe

मुंबईत एका कार्यक्रमाच चित्रीकरण केल्यानंतर सोनू निगमने जेवणात मासे खाल्ले आणि त्यानंतर झालेल्या अॅलर्जी मुळे त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल कराव लागल आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगमला मासे खाल्ल्याने अॅलर्जी झाल्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. या संबधिची माहिती त्याने स्वतः सोशल मिडियावरून फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आहे. मुंबईत एका कार्यक्रमाच चित्रीकरण झाल्यानंतर सोनू बीकेसी येथे जेवणासाठी गेला. जेवणात मासे खाल्ल्याने त्याला ही अॅलर्जी झाली.

- Advertisement -

चाहत्यांना दिला सल्ला

मासे खाल्ल्यावर झालेल्या अॅलर्जीमुळे सोनू निगम ४८ तास आयसीयूमध्ये होता. हॉस्पिटलमधून घरी परत आल्यानंतर सोनूने त्याच्या चाहत्यांसाठी दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटो सोबतच त्याने चाहत्यांना संदेश देखील दिला आहे. ‘तुमचे माझावर असलेले प्रेम आणि काळजी याने मी भारावून गेलो आहे. पण काल मी कोणत्या स्थितीत होतो हे तुम्हाला सांगणे मला गरजेचे वाटत आहे. तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका असा,’ सल्ला सोनूने चाहत्यांना दिला आहे. सोनूने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये मासे खाल्ल्यामुळे झालेल्या अॅलर्जीमुळे त्याचा एक डोळा सूजल्याचे दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये त्याच्यावर आयसीयूत उपचार सुरु असल्याचे दिसत आहे.

दुर्लक्ष करु नका 

मासे खाल्ल्याने झालेल्या अॅलर्जी मुळे सोनूचा डोळा आणि त्वचेला सूज आली आहे. सूरुवातीला त्याने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर सूज वाढल्याने तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. ट्विटमध्ये त्याने असे देखील सांगितले आहे की, ‘नानावटी हॉस्पिटल जवळ असल्याने मी लगेचच तिथे दाखल झालो. मला जर आणखी उशीर झाला असता तर माझ्या जिवावर बेतले असते, तेंव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असेल तर गांभीर्याने घ्या दुर्लक्ष करु नका असा सल्ला सोनूने चाहत्यांना दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -