घरमनोरंजनकंगनाच्या 'थलायवी'वर दक्षिणेमध्ये बोलबाला, तर बॉलिवूड कलाकारांचे 'नो कमेंट्स'

कंगनाच्या ‘थलायवी’वर दक्षिणेमध्ये बोलबाला, तर बॉलिवूड कलाकारांचे ‘नो कमेंट्स’

Subscribe

कंगनाचे तिच्या थलायवी चित्रपटासाठी दक्षिणात्य कलाकारांकडून कौतुक होत आहे पण बॉलिवूडच्या कलाकारांनी अजून ही मौनच बाळगले आहे.

बॉलिवूडची लाडकी क्विन कंगना रणौत हिचा आगामी चित्रपट ‘थलायवी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर या चित्रपटाच्या चर्चा रंगल्या आहे. तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची पटकथा होती. या सिनेमातील कंगना रणौत ने साकारलेली जयललिताची भूमिका सगळ्यांनाच भावली. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर अनेकांनी कंगनाच्या अभिनयाचे जोरदार कौतुक केले. यातच दक्षिणात्य कलाकारांकडूनही कंगनावर कौतुकांचा वर्षाव होत होता.

- Advertisement -

मात्र बॉलिवूड कलाकारांनी तिच्या या अभिनयावर एक अवाक्षरही काढले नाही. त्यामुळे आता बॉलिवूडकरांच्या मौन बाळगण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याआधी काही दिवसांपूर्वी आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. हे दोनही चित्रपट स्त्री प्रधान आहेत. मात्र तरीही आलियाचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रियंका चोप्रा, नीतू कपूर, अक्षय कुमार, करण जोहर, वरुण धवन अशा अनेक बॉलवूड कलाकारांनी तिचे कौतुक करत तिल्या शुभेच्छा ही दिल्या होत्या. पण जेव्हा कंगनाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला त्यावेळी हे सर्वच कलाकार यावर काहीही बोलले नाही. याउलट दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी मात्र ट्विटरवर कंगनाला शुभेच्छा देत तिचे कौतुक केले. कंगनाने नेहमीच बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्यामुळे ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडली आहे. यामुळेच कंगनाच्या ‘थलायवी’ ट्रेलरनंतर बॉलिवूडकरांनी गप्प राहणंच पसंत केले असण्याची शक्यता आहे.


हे वाचा- ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेमध्ये रंगणार होळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -