घरताज्या घडामोडीLive Update : रश्मी शुक्ला यांचे आरोप खोटे, नियमांनुसार पोलिसांच्या बदल्या, कुंटेंच्या...

Live Update : रश्मी शुक्ला यांचे आरोप खोटे, नियमांनुसार पोलिसांच्या बदल्या, कुंटेंच्या अहवालात खुलासा

Subscribe

रश्मी शुक्ला यांचे आरोप खोटे, नियमांनुसार पोलिसांच्या बदल्या, कुंटेंच्या अहवालात खुलासा

रश्मी शुक्ला यांच्याकडून अहवाल लिक झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जर हा आरोप सिद्ध झाला तर त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. या अहवालात सीताराम कुंटे यांनी म्हटले आहे की, मात्र श्रीमती रश्मी शुक्‍ला यांनी सार्वजनिक सुव्यसस्थेला धोका पोहचवण्याची शक्‍यता वर्तवून काही व्यक्तींच्या फोन टॅपींगची परवानगी घेतली ज्याच्या मध्ये त्यांनी जाणीव पुर्वक दिशाभुल करून इंडीयन टेलिग्राफ अक्टखाली परवानगी घेतली असल्याचे सकृत दर्शनी निदर्शनास आली.

- Advertisement -

सचिन वाझे यांना घेऊन एनआयएची टीम मुंब्रा रेतीबंदर खाडीवर गेले आहेत. सचिन वाझे यांना घटनास्थळी नेऊन काही प्रश्न विचारण्यात येत आहेत.


मनसे आमदार राजु पाटिल यांना करोनाची लागण

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक आमदार प्रमोद (राजु) पाटिल यांना करोनाची लागण झाली आहे. मागील काहिदिवसांत ज्या व्यक्ती संपर्कात आल्या होत्या, त्यांनी कोविडची चाचणी करुन घ्यावी असे आवाहन ट्विटरवर ट्विट करुन केले आहे.


ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली


मनसुख हिरेन प्रकरणातील सचिन वाझे यांचे अजून काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. यामध्ये असे दिसते आहे की, वाझे एका गाडीतून बाहेर पडले त्यांच्याकडे काही बॅग होत्या त्यातील एका बॅगमध्ये पैशांचे बंडल आहे. असा संशय एनआयएला आहे.

एनआयएची टीम ट्रायडेंटकडे रवाना झाली आहे. ट्रायडेंट हॉटेलमध्ये वाझे बाहेर पडतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर एनआयए आता घटनेचे पुनरावृत्ती करणार असल्याचे समजते आहे.


राज्यातील राजकीय घडामोडी जलद गतीने घडत आहेत. फोन टॅपींग प्रकरणाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत.


सचिन वाझेच्या एनआयए कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ

एनआयएच्या विशेष न्यायालयाचा निर्णय


मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टाने गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या वसुलीच्या आरोपांबाबत तसेच स्वत:च्या बदलीबाबतची याचिका फेटाळल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

परमबीर सिंह यांच्या याचिकेत कोण-कोणत्या मागण्या? 

१. गृहमंत्री अनिल देशमुख यांची CBI चौकशी व्हावी
२. मुंबई पोलिस आयुक्तपदावरून झालेली बदली बेकायदेशीर ठरवावी
३. पुढील कारवायांपासून संरक्षण मिळावं.


राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आज पोलीस दलातील बदल्यांसंदर्भातील अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करणार आहेत. रशअमी शुक्ला यांनी जो फोन टॅपिंगचा अहवाल दिला होता. तेव्हा सीताराम कुंटे हे गृह विभागाचे अतिरिक्त आयुक्त होते.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याती ९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.


देशात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. गेल्या २४ तासांत ५३ हजार ४७६ रुग्ण आढळले आहेत. तर २६ हजार ४९० रुग्ण बरे झाल आहेत आणि २५१ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १ कोटी १२ लाख ३१ हजार ६५० जण बरे झाले. तर आता ३ लाख ९५ हजार १९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत १ लाख ६० हजार ६९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. ५ कोटी ३१ लाख ४५ हजार ७०९ जणांना लस देण्यात आली आहे.


फोन टॅपिंग प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. कुंटे गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असताना फोन टॅपिंग झालं होतं. कुंटे यांची परवानगी न घेताच रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याचा आरोप महाविकास आघआडीच्या नेत्यांनी केला आहे.


महाविकास आघाडी सरकारमधील नेते आज राज्यपालांची भेट घेणार होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी ही माहिती दिली होती. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईत नसल्याने ही भेट टळणार आहे. राज्यपाल २८ मार्चपर्यंत डेहरादूनच्या दौऱ्यावर आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -