घरमनोरंजनसुनील शेट्टी आणि करिश्माचा 'झांझरिया' गाण्यावर जबरदस्त डान्स

सुनील शेट्टी आणि करिश्माचा ‘झांझरिया’ गाण्यावर जबरदस्त डान्स

Subscribe

बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित, इंडस्ट्रीत ‘अन्ना’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सुनील शेट्टी आणि लोलो म्हणून लोकप्रिय झालेली अभिनेत्री करिश्मा कपूर या तिघांनी मिळून ‘डान्स दीवाने’च्या रंगमंचावर प्रचंड धमाल केल्याचं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो आणि व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. त्यांच्या या परफॉर्मन्सनं सगळ्यांची मनं जिंकून घेतली त्याचं कारण म्हणजे 90 च्या दशकातील लोकप्रिय गाण्यावर त्या दोघांनी डान्स केला. त्या दोघांचा डान्स परफॉर्मन्स पाहून माधुरी दीक्षित शिट्या वाजवू लागली.

या वेळी सेलिब्रेशन स्पेशल गेस्ट असा एक एपिसोड होता. नुकताच या शोमध्ये गोविंदा दिसला आणि आता करिश्मा कपूर दिसली. त्यावेळी करिश्मानं फक्त माधुरी दीक्षितसोबत डान्स केला नाही तर सुनील शेट्टीसोबत देखील डान्स केला आहे. 1996 मध्ये ‘कृष्णा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये करिश्मा कपूर आणि सुनील शेट्टी यांच्यावर चित्रित झालेलं “झांझरिया…” हे गाणं प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं होतं. अभिजीत भट्टाचार्य यांनी हे गाणं गायलं होतं. आता 28 वर्षांनी पुन्हा एकदा याच गाण्यावर करिश्मा व सुनीलने जबरदस्त डान्स केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

 या गाण्यातील सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूर यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले. आता या जोडीला पुन्हा एकदा या गाण्यावर थिरकताना पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत.सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूर यांच्या डान्सच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

करिश्मा कपूरनं डान्स दीवाने या शोमध्ये खास लूकमध्ये हजेरी लावली. ब्लू अँड ब्लॅक कलरची साडी, व्हाईट स्टोनचा बेल्ट अन् इअरिंग्स अशा करिश्माच्या क्लासी लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. ‘डान्स दीवाने’मध्ये प्रेक्षकांना सुनील-करिश्माच्या “झांझरिया…” गाण्याबरोबरच माधुरी आणि करिश्माचा ‘दिल तो पागल हैं’ चित्रपटातील डान्स फेस ऑफ देखील पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे.

- Advertisement -

______________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -