घरमनोरंजनवयाच्या चक्क 50 व्या वर्षी 'सुपर मॉडेल' झाली आई, चाहत्यांना सुखद धक्का...

वयाच्या चक्क 50 व्या वर्षी ‘सुपर मॉडेल’ झाली आई, चाहत्यांना सुखद धक्का !

Subscribe

नाओमीने सोशल मीडिया अकाऊंट वर चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली अनेकांनी तिच्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत

आनंदी राहण्यासाठी कोणत्याही वायाची,वेळेची,जागेची बंधने नसतात असे बोलले जाते. तसेच एका स्त्री साठी आई होणे हे जगातील सर्वात मोठे सुख मानले जाते. आणि या सुखाचा आनंद वयाच्या चक्क 50 व्या वर्षी एका ब्रिटिश सुपर मॉडेलने घेतला आहे. नाओमी कॅम्पबेल हिने एका गोंडस मुलीला वयाच्या 50 व्या वर्षी जन्म दिला आहे. नाओमी कॅम्पबेलचे असंख्य मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर ती कमालीची सक्रिय असते. नाओमीने बाळाचा फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे. तसेच नाओमीने मुलाखती दरम्यान संपूर्ण माहिती शेअर करत संगितले आहे. ‘नो फिल्टर्स विथ नाओमी’ या कार्यक्रमात फॅशन डिझायनर डायान वॉन फर्स्टनबर्गने हजेरी लावली होती. त्यावेळेस दोघांमध्ये अनेक बाबींवर चर्चा झाल्या त्यावेळेस नाओमीने तिचा लॉकडाऊनचा काळ कशाप्रकारे गेला याची माहिती दिली. “लॉकडाउनचा काळ माझ्यासाठी खूपच छान होता आणि तसेच लॉकडाउनमध्ये मी एका मुलीला जन्म दिला आहे.”यावर प्रतिप्रश्न करत डियान वॉन यांनी विचारले आई होणयचा निर्णय कश्याप्रकारे घेतला?यावर नाओमीने उत्तर दिले की,”मला वायची 30 वर्षे होई पर्यन्त काय करावे कळलेच नाही सुरूवातीला मी कायम अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर मात्र मी आई होण्याचे ठरवले. मी आयव्हीएफ प्रक्रियेद्वारे आई झाले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Naomi Campbell (@naomi)

- Advertisement -

नाओमीने सोशल मीडिया अकाऊंट वर चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली अनेकांनी तिच्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत.


हे हि वाचा- माधुरी दीक्षित,अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा ओटीटी वर झळकणार !

- Advertisement -

 

 

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -