घरफिचर्समायमहानगर ब्लॉगअवघ्या १०० रूपयांत होणार Covid-19 टेस्ट; जाणून घ्या कसा होणार फायदा

अवघ्या १०० रूपयांत होणार Covid-19 टेस्ट; जाणून घ्या कसा होणार फायदा

Subscribe

भारतात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव शहरी भागांसह गाव-खेड्यातही वाढताना दिसतोय. अशा परिस्थितीत कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढवणं आवश्यक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन टेस्ट या दोन पद्धतीने कोरोना चाचणी करण्यात येत आहे. मात्र यामध्ये आणखी एका चाचणीची भर पडली आहे ती म्हणजे स्वस्तात मस्त असणाऱ्या कोरोना टेस्ट किटची! ज्याद्वारे अवघ्या १०० रूपयांत कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मुंबईत रॅपिड अँटिजेन टेस्ट किट तयार करण्यात आलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत डीएसटीच्या मदतीने मुंबईतील स्टार्टअप कंपनी पतंजली फार्माने स्वस्तातलं किट तयार केलं आहे. पतंजली फार्माने तयार केलेलं हे किट गोल्ड स्टँडर्ड आरटीपीसीआर टेस्ट किट आणि सध्या असलेल्या रॅपीड अँटिजेन टेस्टसारखंच असणार आहे.

असा होणार फायदा

पतंजली फार्मा संस्थेने भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या डीएसटीच्या मदतीनं हे किफायतशीर किट तयार केले आहे. यासाठी आयआयटी मुंबईचीसुद्धा मदत झाली आहे. या टेस्ट किटची किंमत एका चाचणीसाठी १०० रुपये इतकी असून १० ते १५ मिनिटामध्ये याचा अहवाल प्राप्त होणार आहे. या चाचणीमुळे आता जलदगतीने कोरोना चाचणीचा रिपोर्ट मिळणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

नव्या किटच्या मदतीने अँटिजेन चाचणीला सुरुवात जून महिन्यापासून करण्याचा नियोजन आहे. रॅपिड टेस्ट १० ते १५ मिनिटात होत असल्याने ग्रामीण भागात, डॉक्टरांचे क्लिनिक आणि जिथं पॅथॉलॉजी, डायग्नोस्टिक लॅब नाहीत अशा ठिकाणी या किटची मदत होणार आहे. किट स्वस्त असल्यानं प्रत्येकाच्या खिशाला परवडणारे आणि कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.

रॅपिड अँटिजेन टेस्ट म्हणजे?

या टेस्टमध्ये रुग्णाच्या नाकातून नमुने घेऊन अँटिजेन शोधण्यात येतात. अँटिजेन म्हणजे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मिसळलेला परदेशी पदार्थ. SARS-CoV-2 विषाणूमध्ये हा परदेशी घटक आढळतो. नेहमीच्या प्रयोगशाळेबाहेर ही अँटिजेन डिटेक्शन टेस्ट करता येईल, तसेच रिझल्टही लगेच मिळेल. या टेस्टिंग किटला स्टँडर्ड क्यू कोविड-१९ एजी डिटेक्शन किट म्हटले जाते.

- Advertisement -

RT-PCR आणि अँटिजेन मधील फरक?

सध्या RT-PCR टेस्टने करोना व्हायरसचे निदान केले जाते. RT-PCR प्रमाणेच अँटिजेन डिटेक्शन टेस्टने शरीरामध्ये व्हायरसने शिरकाव केला आहे का? ते शोधून काढण्यात येणार आहे. दोन्ही चाचण्यांच्या पद्धतीमध्ये फरक आहे. RT-PCR टेस्टसाठी खास लॅबची आवश्यकता असते, पण अँटिजेन डिटेक्शन टेस्टसाठी अशा लॅबची गरज भासत नाही. कारण किटसोबत असलेली उपकरणे पुरेशी आहेत. RT-PCR ने चाचणी केल्यानंतर चाचणीचा रिपोर्ट येण्यासाठी दोन ते पाच तासाचा कालावधी लागतो. पण तेच रॅपिड अँटिजेन डिटेक्शन टेस्टमुळे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आहे की, नाही ते अर्ध्या तासात समजण्यास मदत होते.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -