घरCORONA UPDATEफुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी श्वासाचे कोणते व्यायाम कराल ?

फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी श्वासाचे कोणते व्यायाम कराल ?

Subscribe

भविष्यात कोणता धोका निर्माण होऊ नये म्हणून फुफ्फुसांचा व्यायम करणे नेहमीच फायदेशीर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची कमरता जाणवत आहे. श्वास घेता न येणे ही सामान्य समस्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वांना जाणवली. शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढविण्याची खूप गरज आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या किंवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी दररोज श्वास रोखून ठेवण्याचा व्यायाम करणे उपयोगी ठरेल. त्याचबरोबर ज्यांना कोरोना झालेला नाही अशा लोकांनीही आपली फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी, भविष्यात कोणता धोका निर्माण होऊ नये म्हणून हा व्यायम करणे नेहमीच फायदेशीर ठरले. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने हा व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. (What breathing exercises will increase lung capacity in covid19)

छाती शस्त्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष, मेदांताचे संस्थापक आणि लंग केअर फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त, डॉ.अरविंद कुमार यांनी सांगितल्यानुसार, सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी हा व्यायाम अतिशय फायदेशीर आहे. अशा रुग्णांनी हा व्यायाम केल्यास त्यांना ऑक्सिजन लावण्याची गरज भासणार नाही. श्वास रोखून धरण्याची वेळ कमी कमी होऊ लागली तर योग्य वेळी कळेल व आपण डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घेऊ शकतो. आपल्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळल्यास आपण कोरोना चाचणी करतो. त्याचे निदान होई पर्यंत ४ ते ५ दिवस जातात. यावेळेत रुग्णांच्या फुफ्फुसावर परिणाम झालेला असतो. त्या काळात फुफ्फुसांचा हा व्यायाम करणे अत्यंत फायदेशीर ठरेल असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

श्वास रोखून धरण्याचा व्यायाम कसा कराल?

  • पहिल्यांदा सरळ ताठ बसा.
  • तुमचे दोन्ही हात मांड्यांवर ठेवा.
  • नंतर तोंड उघडून छाती भरेपर्यंत हवा तोंडावाटे आत घ्या.
  • त्यानंतर ओठ घट्ट मिटा.
  • शक्य होईल तितक्या वेळ श्वास राखून धरण्याचा प्रयत्न करा.
  • किती वेळ श्वास राखून धरु शकता ते पहा.

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, रुग्णांनी दर तासाला हा व्यायाम करुन बघावा. श्वास रोखण्याचा कालावधी रुग्णांना सरावाने वाढविता येईल. २५ सेकंद किंवा त्यापेक्षा अधिक काळ श्वास रोखून धरू शकणारे रुग्ण सुरक्षित आहेत असे समजले जाते. त्यांच्या आरोग्याला धोका नाही. फक्त हा व्यायाम करताना फार कठोरपणे प्रयत्न करून थकवा येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे,असेही ते म्हणाले.


हेही वाचा – Home Isolation रुग्णांनी किती तासात मास्क बदलावा ? कोणती औषधे टाळावीत ?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -