घरमहाराष्ट्रनाशिकशहर हद्दीतून जाणार्‍या सुरत-चेन्नई मार्गाचे मायक्रो प्लॅनिंग करा

शहर हद्दीतून जाणार्‍या सुरत-चेन्नई मार्गाचे मायक्रो प्लॅनिंग करा

Subscribe

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बैठकीत खासदार गोडसे यांच्या सूचना

शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढता विस्तार लक्षात घेवून भविष्यातील अपघातांना आळा बसावा, वाहतुकीची कोंडी होवू नये, संभाव्य वाहतुकीच्या कोडीमुळे शहरवासीयांना मनस्ताप होवू नये, दररोज शहरात येणारे शेतकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार यांची कुंचबना होवू नये यासाठी सुरत-चेन्नई महामार्गाचे नियोजन करण्यासाठी आतापासूनच विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत मनपा हद्दीतून जाणार्‍या या महामार्गाचा डीपीआर तांत्रिकदृष्ट्या बिनचूक तयार करण्याच्या सूचना खा. गोडसे यांनी प्रशासनाला दिल्या.

यावेळी नॅशनल हायवे विभागाचे दिलीप पाटील, श्री. साळुके, बांधकाम व्यावसायिक नरेंद्र ठक्कर, नेमीचंद पोतदार आदी उपस्थित होते. मनपा हद्दीतून जाणार्‍या सुरत-चेन्नई महामार्ग उभारणीत कोणतेही तांत्रिक त्रुटी राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी महामार्ग मुंबई-आग्रा महामार्ग (NH-3) ला क्रॉस होत आहे, तेथे बटरफ्लाय क्रॉसिंग इंटरचेंज प्रस्तावित करण्यात यावा, ज्या ठिकाणी महामार्ग ३० मी, २४ मी, १८ मी रूंद मंजूर डीपी रस्त्यांना कॉस होत असेल त्या ठिकाणी डीपी रस्त्याच्या रूंदीचा वेहिक्युलर अण्डर पास (व्हीयु.पी) प्रस्तावित करण्यात यावा आदी सूचना खासदार गोडसे यांनी दिल्या. या महामार्गावर सुविधा आणि यंत्रणा उभारणीसाठी मायक्रो प्लानिंग करण्यास त्यांनी सूचविले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -