घरट्रेंडिंगप्रियकराने दिला नकार, गिफ्ट दिलेली २३ लाखांची बाईक पेटवून घेतला प्रेयसीने बदला

प्रियकराने दिला नकार, गिफ्ट दिलेली २३ लाखांची बाईक पेटवून घेतला प्रेयसीने बदला

Subscribe

सध्याच्या काळात लोकांमध्ये प्रत्येक नात्याचे महत्त्व कमी होताना दिसत आहे. या काळात नाते संबंध जोडणे आणि नंतर ते तोडणे खूप सामान्य होत आहे. अशा परिस्थितीत अनेक जण स्वतःला सावरतात, परंतु काही लोकं असे काहीतरी करतात जे विचार करण्यापलिकडेच असते. सध्या सोशल मीडियावर एका धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला आपल्या एक्स-बॉयफ्रेंडच्या बाईकला आग लावताना दिसत आहे.

हा थायलँडचा व्हिडिओ आहे. महिलेला तिचा एक्स-बॉयफ्रेंड पुढे नातेसंबंध ठेवण्यास नकार देतो. त्यामुळे ती थेट बदला घेण्यासाठी त्याच्या बाईकलाच आग लावते. ३६ वर्षांच्या महिलेचे हे कृत्य पार्किंगमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेरात कैद झाले आहे.

- Advertisement -

महिला आपल्या बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी बँकॉकच्या श्रीनाखरिनविरोट विद्यापिठात पोहोचली. जिथे तिचा एक्स-बॉयफ्रेंड काम करतो. तिथे पोहोचल्यानंतर महिलेने पार्किंगमध्ये उभी असलेली एक्स बॉयफ्रेंडची सुमारे २३ लाख रुपयांची बाईक कोणताही न विचार करता पटवून दिली. महत्त्वाचे म्हणजे या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु आग लावलेल्या बाईकच्या जवळ असलेल्या ६ बाईकला देखील आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका युट्यूब चॅनलेवर हा व्हिडिओ पब्लिश करण्यात आला आहे.

माहितीनुसार, महिलेने ज्या बाईकाला आग लावली, ती २३ लाखांची ट्रायम्फ बाईक तिने एक्स बॉयफ्रेंडला गिफ्ट स्वरुपात दिली होती. जेव्हा ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. सध्या घटनेचा तपास केला जात असून महिलेवर जाळपोळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -