घरमनोरंजनहाडांची काळजी घ्या

हाडांची काळजी घ्या

Subscribe

आपली हाडं मजबूत असली की आपलं शरीर आपोआपच मजबूत राहतं. हाडातील कणखरपणा खूप गरजेचा असतो. आपले शरीर उभे राहते कारण त्याला हाडांचा आधार असतो. पण हाडे मजबूत नसली तर शरीर ताठ राहणार नाही. शरीराचा हा आधार असलेली हाडं वयाची ३० वर्षे उलटल्यानंतर कमकुवत व्हायला सुरुवात होते. हा कमकुवतपणा टाळण्यासाठी काही ठरावीक प्रकारची खाद्यपदार्थ आवश्यक समजली जातात. त्यांचा आपल्या दररोजच्या आहारात वापर केल्यास हाडं मजबूत राहतात.

* हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियममुळेच हाडांची व्यवस्थित वाढ होत असते. हा कॅल्शियमचा पुरवठा करणारे सर्वात मुख्य अन्न म्हणजे दूध.

- Advertisement -

* दररोज किमान ७०० मिलीग्राम कॅल्शियमचा पुरवठा शरीराला आवश्यक असतो. तो दुधातून होतो. परंतु कॅल्शियमसाठी म्हणून दूध प्यायला लागलो तर चरबी वाढण्याचा धोका असतो. म्हणून दूध पिताना ते चरबीमुक्त असावे. म्हणजेच जास्त घट्ट दूध पिऊ नये. शक्यतो गायीचे दूध प्यावे.

* दुधामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, रिबोप्लेविन फॉस्फरस आणि जीवनसत्व ड, अ आणि ब-१२ यांचाही समावेश असतो. हे सगळे अन्न घटक हाडे मजबूत होण्यासाठी असतात.

- Advertisement -

* शिवाय हिरव्या पालेभाज्या याही हाडांसाठी उपयुक्त ठरतात. हिरव्यागार पालेभाज्या जाणीवपूर्वक खाल्ल्या पाहिजेत, कारण त्यातून ‘ड’ जीवनसत्व आणि कॅल्शियम मिळते.

* हाडे मजबूत होण्याकरिता शेंगादाणे आणि पिस्ता यांचा वापर करावा. पिस्त्यामध्ये ओमेगा-३ हा घटक असतो आणि काही फॅटी अ‍ॅसिडस्ही असतात.

* बदाम आणि शेंगदाणे यातूनही पोटॅशियमचा पुरवठा होतो. आपल्या लघवीमधून काही वेळा कॅल्शियम जाण्याची शक्यता असते. हा कॅल्शियमचा नाश बदामामुळे टळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -