घरमुंबईडिजिटल ग्रंथालयात कॉम्प्युटरचा अभाव

डिजिटल ग्रंथालयात कॉम्प्युटरचा अभाव

Subscribe

डिजिटलकडे वाटचाल करत असल्याचा दावा मुंबई विद्यापीठाकडून करण्यात येत असला तरी विद्यापीठाच्या राजाभाई टॉवर ग्रंथालयामध्ये पीएचडीचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रबंध टाईप करण्यासाठी विद्यार्थ्यांना खिशातील पैसे खर्च करावे लागत आहेत. विद्यार्थ्यांना राजाभाई टॉवर ग्रंथालयात कॉम्प्युटर उपलब्ध करुन देण्याची मागणी विद्यार्थी संघटनेकडून करण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठातून पीएचडी आणि एमफील करणार्‍या विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची आहे. परंतु पीएचडी व एमफील करण्यासाठी विद्यापीठात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना या सुविधा मिळत नाहीत. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील राजाभाई ग्रंथालयात मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव आहे. पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध नसल्याचा आरोप शोमितकुमार साळुंखे यांनी केला आहे. या सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी साळुंखे यांनी केली आहे.

- Advertisement -

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक उपलब्ध करुन देणे, बसण्याची जागा, इंटरनेट, स्कॉनर, प्रिंटर या सुविधा पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याची मागणी शोमितकुमार साळुंखे यांनी केली आहे. यासंदर्भात साळुंखे यांनी यासंदर्भात एक निवेदन कुलगुरु सुहास पेडणेकर यांना दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -