घरमनोरंजन'तारक मेहता...' मधील सोढी बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरू

‘तारक मेहता…’ मधील सोढी बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरू

Subscribe

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ आणि रोशन सिंह सोढी कुणाला माहिती नसणार, असं कधीच होणार नाही. जसा जेठालाल लोकप्रिय आहे, तसाच रोशन सिंह सोढी देखील प्रसिद्ध आहे. पण रोशन सिंह सोढी ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात रुजवणारा अभिनेता गुरुचरण सिंह गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. गुरुचरण सिंह हे बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सिंह यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. तर, सोढी यांनी चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने एक पोस्ट केली होती.

गुरुचरण सिंहच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी नुसार, 50 वर्षीय गुरुचरण सिंह विमानाने दिल्लीहून मुंबईला निघाले होते. सकाळी 8.30 मिनिटांनी ते घरातून निघातले. पण गुरुचरण मुंबईला पोहोचले नाहीत किंवा घरी गेलेले नाहीत. गेल्या चार दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची माहिती तक्रारीमध्ये देण्यात आली आहे.

- Advertisement -

गुरुचरण सिंह बेपत्ता झाल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी वडिलांसोबतच्या फोटोंचे कोलाज करुन व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ‘Divine Birthday to Father’ असे कॅप्शन दिले आहे.

 गुरुचरण हे दिल्लीवरुन मुंबई यायला निघाले होते. ते मुंबई विमानतळावर तर पोहोचले. पण घर तेथून ते कुठे गेले हे कळाले नाही. त्याची फॅमिली फ्रेंड भक्ती सोनी त्यांना घेण्यासाठी मुंबई विमानतळावर गेली होती. पण तिला ते कुठेच सापडले नाही. तिने एअरपोर्ट अथॉरिटीशी संपर्क केला तेव्हा त्यांना कळाले की ते विमानात चढलेच नाहीत. पण फ्लाइटमध्ये चढण्याआधी गुरुचरण यांनी भक्तीला मेसेज करुन फ्लाइटमध्ये बोर्ड होत असल्याचा मेसेज केला होता. त्यामुळे ते गेले कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

- Advertisement -

गुरुचरण सिंग यांनी ‘रोशन सिंह सोढी’ ची भूमिका साकारली होती. सोढी ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 2013 मध्ये त्यांनी हा शो सोडला होता. मात्र, पुढील वर्षी पुन्हा एकदा कमबॅक केले. 2021 मध्ये, शो का सोडावा लागला याचे उत्तर ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्या सुमारास त्याच्या वडिलांची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्याशिवाय, खासगी आयुष्यातही काही गोष्टींची काळजी घ्यावी लागत होती. त्यामुळे शोमधून बाहेर पडलो असल्याचे त्यांनी सांगितले.

________________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -