घरमनोरंजनजयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात

जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात

Subscribe

चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली असून हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत तयार करण्यात येणार आहे.

बॉलीवूडची अभिनेत्री कंगना रणावतच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित ‘थलायवी’ या चित्रपटात कंगना प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. कंगना सोबत या चित्रपटात अरविंद स्वामी हे एमजीआर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली असून हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत तयार करण्यात येणार आहे.

- Advertisement -

कंगना घेतेय मेहनत

चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या शुटींगची घोषणा केली आहे. या चित्रपटासाठी कंगना भरपूर मेहनत घेत आहे. तमिळ भाषा शिकण्यापासून ती नृत्याचे धडेसुद्धा गिरवत आहे. या चित्रपटात मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या भूमिकेसाठी अभिनेता प्रकाश राज यांची विचारणा करण्यात येत आहे.

- Advertisement -

चित्रपटावर स्टे आणण्याची याचिका

दरम्यान जयललिता यांच्या भाचीने चित्रपटाबद्दल मद्रास उच्च न्यायालयात चित्रपटाला स्टे आणण्याबाबत याचिका सादर केली. त्यांनी सांगितले की, ‘थलायवी’ या चित्रपटाचे निर्देशक एएल विजय यांनी चित्रपटासाठी त्यांची परवानगी घेतलेली नाही. २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -