घरमनोरंजननीना गुप्ता प्रेग्नंट असताना 'या' अभिनेत्याने घातली होती लग्नाची मागणी

नीना गुप्ता प्रेग्नंट असताना ‘या’ अभिनेत्याने घातली होती लग्नाची मागणी

Subscribe

नीना गुप्ता आणि सतीश कौशिक या दोघांनी जाने भी दो यारों, मंडी या सारख्या सिनेमात एकत्र काम केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ने सोमवारी दिग्गज अभिनेत्री नीना गुप्‍ता (Neena Gupta) यांच्या ऑटोबायॉग्राफी ‘सच कहूं तो’ या पुस्तकाचे नुकतच प्रकाशन केले. नीना गुप्ताच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्यांच्या खाजगी आयुष्यातील घडामोडींची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगताना दिसते. नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या आपल्या ऑटोबायोग्राफीमुळे (Neena gupta autobiography) पुन्हा एकदा लाईम लाइटमध्ये आली आहे. नीना गुप्ता क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. याचदरम्यान लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असतांना नीना प्रेग्नंट झाली होती आणि यानंतर आपल्या मुलीचा अविवाहित म्हणून एकटीने सांभाळ केला. नुकतच प्रकाशित झालेल्या तिच्या ‘सच कहूं तो’ या पुस्तकात तिने आपल्या आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. पुस्तकात नीनाने अभिनेते सतीश कौशिकबाबतही (Sastish kaushik) महत्वपुर्ण खुलासा केल्याने केला आहे.

नीना क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. त्याच्यापासून ती गरोदर राहिली होती प्रेग्नन्सीमध्ये सतीश कौशिक यांनी आपल्याला लग्नाची मागणी घातली होती असं नीता गुप्ताने पुस्तकात लिहलं आहे (Satish Kaushik Proposed Pregnant Neena Gupta For Marriage) . नीना- विवियन प्रेगेंन्सीदरम्यान दोघंही वेगळे झाले होते. तेव्हा प्रेग्नंट नीनाचा तिच्या बाळासह आयुष्यभर हात धरण्यासाठी सतीश कौशिक पुढे आले. त्यांनी नीनाला लग्नासाठी मागणी घातली. तिच्या बाळासह तिचा स्वीकार करण्याचं ठरवलं. बाळाला आपलं नाव देण्याचीही इच्छा व्यक्त केली होती असं वक्तव्या नीनने तिच्या पुस्तकात केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

- Advertisement -

नीना गुप्ता आणि सतीश कौशिक या दोघांनी जाने भी दो यारों, मंडी या सारख्या सिनेमात एकत्र काम केलं आहे. आपल्या खासगी आणि पर्सनल आयुष्यालाही तिनं दुसऱ्यांदा संधी दिली. बधाई हो या सिनेमात नीनाच्या अभिनयाची जोरदार चर्चा रंगली. तिने बॉलिवूडमध्ये जोरदार पुनरागमन केलं. त्यानंतर ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ ही फिल्म केली. ‘पंचायत’ वेबसीरिजमध्येही ती दिसली. नुकतीच रिलीज झालेली सरदार का ग्रैंडसन’ फिल्ममध्येही ती दिसली. आता ती गुडबाय फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – ‘मेरी कॉम’ मध्ये प्रियांकाच्या जागी मणि‍पुरी ॲक्टर का निवडली नाही?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -