मिथून चक्रवर्तीला दाऊदकडून मिळाल्या होत्या जिवे मारण्याच्या धमक्या

Mithun Chakraborty dawood ibrahim

बॉलिवुडचा डिस्को डान्सर म्हणून ख्याती मिळवलेल्या मिथून चक्रवर्ती यांचा जन्म १६ जून १९५० रोजी झाला. आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केल्यानंतर पहिल्याच चित्रपटात घवघवीत असे यश मिथून चक्रवर्ती यांना मिळाले. १९७६ मध्ये मृगया चित्रपटाच्या माध्यमातून मिथून चक्रवर्ती यांनी फिल्मी करिअरची सुरूवात केली. त्यामध्ये बेस्ट एक्टर म्हणून त्यांना राष्ट्रीय अवॉर्डही मिळाला. एक्टिंग, डान्सिंग आणि एक्शनमध्ये महारत मिळवलेल्या मिथून चक्रवर्ती यांनी पहिल्या चित्रपटापासूनच आपल्या करिअरची धमाकेदार अशी सुरूवात केली. बंगाली, हिंदी, ओरिया, भोजपुरी, तमिळ, तेलुगू, पंजाबी यासारख्या विविध भाषिक चित्रपटाच्या माध्यमातून मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या फिल्मी करिअरचा आलेख हा चढताच ठेवला. जवळपास ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मिथून चक्रवर्ती यांच्या करिअरच्या सर्वोच्च अशा काळात त्यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची धमकी आली होती. एका अभिनेत्रीमुळे ही धमकी मिथून चक्रवर्ती यांना आली होती. त्यावेळी बॉलिवुडच्या संजय दत्त हा मिथुन चक्रवर्तीच्या मदतीला धावून आला होता.

१९८० च्या दशकात बॉलिवुडवर अंडरवर्ल्डचा दबदबा होता. याच काळात मिथून चक्रवर्तीचेही फिल्मी करिअर पीकला होते. याच काळात अंडरवर्ल्डमधून अनेकांना धमकी येण्याची प्रकरणे समोर येत होती. त्यामध्ये इंडस्ट्रीतील अनेक बड्या सेलिब्रिटींचा आणि मोठ्या नावांचाही समावेश होता. याच काळात मिथून चक्रवर्तींनाही अंडरवर्ल्ड डॉन मिथून चक्रवर्तींकडून धमकी मिळण्याची माहिती समोर आली होती. या धमकीसाठी मिथून चक्रवर्ती यांच्या सुपरहिट चित्रपटातील एक अभिनेत्री कारणीभूत ठरली होती. बॉलिवूड अभिनेत्री मंदाकिनीने अनेक चित्रपटांमध्ये मिथून चक्रवर्ती यांच्यासोबत काम केले होते. मिथून चक्रवर्ती आणि मंदाकिनीच्या निमित्ताने असलेल्या चर्चा पाहता मिथुन चक्रवर्तीला अंडरवर्ल्डमधून धमकी आली होती. मंदाकिनीसोबतची ऑन स्क्रिन केमिस्टी हीच या धमकीमागचे मुख्य कारण होते. प्रेक्षकांचीही या जोडीला पसंती मिळत असल्याने आणखी चित्रपटांची अपेक्षा या जोडीकडून करण्यात येऊ लागली. पण त्याच काळात मंदाकिनी आणि मिथून चक्रवर्ती यांच्यातील अफेअरच्या बातमीमुळेच मिथून चक्रवर्तीला धमक्या येऊ लागल्या. मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील रिलेशनशीपच्या चर्चेमुळे मिथून चक्रवर्तीला ही धमकी आली होती. त्यामुळेच मंदाकिनीपासून मिथूनला दूर राहण्याची धमकी येऊ लागली. या दोघांनी एकत्र काम करावे हेदेखील दाऊदला पसंत नव्हते. त्यामुळेच या दोघांनी एकत्र काम करू नये यासाठी मिथून चक्रवर्तीवर डॉनच्या माणसांकडून पाळत ठेवण्यात आली होती. खुद्द मिथून चक्रवर्ती यांनाही या गोष्टीची माहिती होती. तसेच वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे मिथून चक्रवर्तीही घाबरले होते.

या धमक्यांच्या प्रकरणांमुळे मिथून चक्रवर्ती पुर्णपणे घाबरले होते. या धमक्यांच्या प्रकरणांमुळेच त्यांनी संजय दत्तची मदत घेण्याचे ठरविले. त्यावेळीच संजय दत्तनेही मिथून चक्रवर्तीला सल्ला दिला की मंदाकिनीसोबत यापुढे चित्रपट करू नकोस. त्यानंतर संजय दत्तने अंडरवर्ल्डमधील काही माहितीतल्या लोकांसोबत संपर्क करून या प्रकरणावर बोलण केले आणि या संपुर्ण प्रकरणावर पडदा टाकला.