घरमनोरंजन'बाप ऑफ ऑल फिल्म्स'मध्ये 90 च्या दशकातील 'हे' दिग्गज अभिनेते दिसणार एकत्र

‘बाप ऑफ ऑल फिल्म्स’मध्ये 90 च्या दशकातील ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसणार एकत्र

Subscribe

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ सध्या त्यांच्या ‘फोन भूत’मुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही. परंतु या चित्रपटातील त्यांचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धार्थ चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत. याचंदरम्यान, अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन नव्या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. जो पाहताच त्यांचे चाहते खूप खूश झाले आहेत.

जॅकी श्रॉफ यांनी शेअर केलं पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu)

- Advertisement -

‘फोन भूत’ चित्रपटानंतर अभिनेते जॅकी श्रॉफ त्यांच्या ‘बाप ऑफ ऑल फिल्म्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा करत जॅकी श्रॉफ यांनी एक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यामध्ये 90 च्या दशकातील अभिनेते मिथुन चक्रवर्ती, सनी देओल, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ दिसत आहेत. सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या अभिनेत्यांचे चाहते खूप खूश झाले आहेत. या चित्रपटांमध्ये या चौघांची वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली नाही. मात्र, प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जॅकी श्रॉफ यांनी शेअर केलेल्या या पोस्टरवर अनेक चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारही कमेंट करत आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

मनोज वाजपेयीच्या आगामी ‘कोर्टरूम ड्रामा’चे फोटो व्हायरल; मुंबईत सुरू आहे शूटिंग

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -