घरमनोरंजनमनोज वाजपेयीच्या आगामी 'कोर्टरूम ड्रामा'चे फोटो व्हायरल; मुंबईत सुरू आहे शूटिंग

मनोज वाजपेयीच्या आगामी ‘कोर्टरूम ड्रामा’चे फोटो व्हायरल; मुंबईत सुरू आहे शूटिंग

Subscribe

अलीकडेच या चित्रपटाच्या टीमने जोधपूरमध्ये शूटिंग शेड्यूल पूर्ण केले.

तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते मनोज वाजपेयी यांनी अलीकडेच त्यांच्या आगामी कोर्टरूम ड्रामाची घोषणा केली. विनोद भानुशाली यांच्या भानुशाली स्टुडिओ लिमिटेड, सुपर्ण एस वर्मा या कोर्टरूम ड्रामाच्या सेटवरील फोटोस इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

या कोर्टरूम ड्रामाचे (courtroom drama) चित्रीकरण मागील महिन्यात सुरुवातीच्या आठवड्यात सुरू झाले असून, मुंबईत सुरू असलेल्या शूटिंगचे काही फोटो आता समोर आले आहेत. ही छायाचित्रे मुंबईच्या सेट वरची आहेत, ज्यामध्ये कोर्ट रूमचे काही इंटेन्स सीन्स शूट केले जाणार आहेत. तसेच सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत या शेड्युलचे चित्रीकरण मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे.

- Advertisement -

अलीकडेच, या चित्रपटाच्या टीमने जोधपूरमध्ये शूटिंग शेड्यूल पूर्ण केले. मनोज वाजपेयी यांनी या दौऱ्यादरम्यान शहरातील आदरातिथ्य अनुभवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिवाय, चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाच, हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता चित्रपटांच्या निर्मात्यांनी केली आहे.

- Advertisement -

या हार्ड हिटिंग कथेसह दिग्दर्शक अपूर्व सिंग कार्की (director apoorv singh karki) यांचे हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण होत आहे, ज्यांनी अनेक एस्पिरेंट्स, सास बहू आचार प्रायव्हेट लिमिटेड, आणि फ्लेम्स यांसारखे लोकप्रिय ओटीटी शो केले आहेत. सुपर्ण एस वर्मा आणि मनोज वाजपेयी हे पुरस्कार विजेती मालिका ‘द फॅमिली मॅन’नंतर आता पुन्हा एकत्र येत आहेत. तसेच, या चित्रपटात उत्तमोत्तम कलाकारांची फळी आहे. सुपर्ण एस वर्माचा कोर्टरूम ड्रामा अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित य चित्रपटाचे विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, आसिफ शेख आणि विशाल गुरनानी हे निर्माते आहेत.


हे ही वाचा – विवेक अग्निहोत्री करणार कोविड काळावर आधारित चित्रपट; नाना पाटेकर मुख्य भूमिकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -