तेलंगणामध्ये मासळीचा पाऊस, दुर्मिळ घटना

तेलंगणामध्ये आभाळातून पावसाचे पाणी नाही तर चक्क जिवंत माशांचा पाऊस कोसळत आहेत

सध्या देशभरात अनेक राज्यांमध्ये पावसाने धूमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र तेलंगणामध्ये आभाळातून पावसाचे पाणी नाही तर चक्क जिवंत माशांचा पाऊस कोसळत आहेत. या दुर्मिळ घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून जगभरातील संशोधक यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत.

तेलंगणामधील जगतियल वसाहतीमधील साई नगर येथे हा माशांचा पाऊस पडत आहे. साधारणत अशी घटना तेव्हाच घडते जेव्हा बेडूक, खेकडे आणि मासे असे छोटे जलचर प्राणी पावसाळ्यात हवेच्या दाबाने निर्माण होणाऱ्या पाण्याच्या भोवऱ्यात अडकून आकाशाकडे फेकले जातात आणि नंतर हवेचा दाब कमी झाल्यावर पुन्हा जमिनीवर आदळतात. प्रामुख्याने पाण्यावर जेव्हा हवेचा दाब वाढून चक्रीवादळासारखे भोवरे तयार होतात. तेव्हा असे भोवरे निर्माण होतात.

तेलंगणामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तेथे हवेचा दाब वाढला आहे. यातूनच हा माशांचा पाऊस पडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी अमेरिकेतील टेक्सासमधील टेक्सारकाना शहरातही असाच मासळीचा पाऊस पडला होता.

 

.