घरमनोरंजनजादुयी जंगलात कलारी किड्स

जादुयी जंगलात कलारी किड्स

Subscribe

शाळेला सुट्टी पडली की आता काय करायचे हा प्रश्न मुलांना, त्यांच्या पालकांनाही सहसा पडत नाही कारण त्यांच्या आवडीच्या सर्वच गोष्टी जवळपास उपलब्ध झालेल्या आहेत. निदान बारा तास तरी गुंतून राहतील इतकी मनोरंजनाची माध्यमे त्यांच्यासमोर आहेत. आवडता छंद ते यानिमित्ताने जपू शकतात. जवळपास असलेल्या कार्यशाळेत त्यांना सहभागी होता येईल. मोबाईलवर चित्तथरारक गेमही भरपूर उपलब्ध आहेत. त्यातूनही विरंगुळा म्हणून नाटक, चित्रपट पाहता येईल आणि त्यातूनही काहीच जमले नाही तर घरातला टीव्ही मनोरंजनासाठी सज्ज आहेच. कार्टून नेटवर्क, डिजनी बरोबर कोणती वाहिनी लहान मुलं जास्त पहात असतील तर त्यात पोगोचे नाव सांगता येईल. उन्हाळ्याची सुट्टी लक्षात घेऊन या वाहिनीने 15 एप्रिलपासून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 5 वाजता कलारी किड्स ही मालिका प्रक्षेपित करण्याचे ठरविलेले आहे. गुरु पालन आणि गुरु वेता हे दोन गुरु या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या भेटीला येणार आहेत. या दोघांचे स्वतंत्र असे ग्रूप आहेत. आपलाच विजय व्हावा यासाठी या दोन्ही संघांची धडपड आहे. चित्तथरारक स्टण्ट्स, साहसी खेळ इथे होणार आहेत. त्यासाठी जादूने आणि रहस्याने भरलेले घनदाट जंगल चित्रीकरणासाठी निवडलेले आहे. प्राचीन मार्शल आर्ट कल्लरीपयोटू शिकण्यापासून ते कलारीपुरम् जादुयी नगरी बच्चेमंडळींना अनुभवायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -