घरमनोरंजनमनसेच्या आक्षेपानंतर आदित्य नारायणची ‘त्या’ वक्तव्यावर बिनशर्थ माफी !

मनसेच्या आक्षेपानंतर आदित्य नारायणची ‘त्या’ वक्तव्यावर बिनशर्थ माफी !

Subscribe

माझ्या सुद्धा अलिबागशी अनेक भावना आणि प्रेम जोडलेल्या आहेत. तिथल्या लोकांचा,मातीचा माला आदर आहे." फेसबुक पोस्ट द्वारे आदित्यने माफीनामा प्रकट केला आहे.

सोनी टिव्ही वरील लोकप्रिय तितकाच वादाच्या भोवर्‍यात अकणार शो म्हणजे ‘इंडियन आईडल12’ या रियलिटी शो मध्ये अनेक कारणावरून वाद होत आहेत. कधी शो मधील जजेस वर त्यांनी कंटेन्सटंला दिलेल्या कमेंटवर टीका करण्यात येते. तर काही शोमधील स्पर्धकाची खोटी स्टोरी दाखवण्यात येते. इतकेच नाही तर या शो मधील पूर्व स्पर्धकसुद्धा शो च्या कॉन्सेप्टवर टीका करताना दिसतता. आता शो मधील होस्ट आदित्य नारायण त्याच्या वागणुकीमुळे,वक्तव्यामुळे लोकांच्या ट्रोलींगचा शिकार होत आहे. त्याचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. आणि या व्हिडिओवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या विवादीत व्हिडिओ मध्ये आदित्य एका आर्टिस्टला अलिबागवरून टोमणा मारला आहे. मात्र या शब्दावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि अलिबागकार प्रचंड संतापले. यापुढे अलिबाग बद्दल कुठलेही वक्तव्य केले तर तुझ्या कानशीलात लगावेल असा थेट इशारा त्यांनी दिला होता. अमेय खोपकरांनी दिलेल्या धमकी वजा इशार्‍या नंतर आदित्य नारायण याने फेसबुक पोस्टद्वारे अलिबागकरांची माफी मागितली आहे. पोस्ट मध्ये आदित्य म्हणाला आहे की,मी एका एपिसोड दरम्यान अलिबागबद्दल जे विधान केले त्यावरून अनेक लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत हात जोडून माफी मागतो. माझा कोणालाही दुखवण्याचा हेतु नव्हता. माझ्या सुद्धा अलिबागशी अनेक भावना आणि प्रेम जोडलेल्या आहेत. तिथल्या लोकांचा,मातीचा माला आदर आहे.” फेसबुक पोस्ट द्वारे आदित्यने माफीनामा प्रकट केला आहे.

- Advertisement -

नेमका वाद काय आहे?
विवादीत व्हिडिओ मध्ये आदित्य एका एपिसोड दरम्यान आर्टिस्टला अलिबागवरून टोमणा मारला आहे. “राग पट्टी ठिक से डिया करो,हम कया अलिबागसे आये है कया?” असे वक्तव्य केले होते. आदित्यच्या या सांभाषनावरून हाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि अलिबागकार प्रचंड संतापले. तसेच अनेकांना आदित्यचे हे बोलणे आवडले नाही. त्याच्या विरोधात रोष प्रकट करत अमेय खोपकर यांनी माफी मागण्यास संगितले होते.

काय म्हणले होते अमेय खोपकर जाणून घेऊया?

- Advertisement -

अमेय खोपकर यांनी एका फेसबुक व्हिडिओद्वारे आदित्य नारायण याला खडेबोल सुनावले. “मी आदित्य नारायणचा एक व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओमध्ये तो एका व्यक्तीवर संतापला अन् म्हणाला मी काय अलिबागवरुन आलोय का? त्याचं हे बोलणं आम्हाला खटकलं आहे. आलिबागची लोकं तुम्हाला इतकी मुर्ख वाटतात का? त्यानं आत्ताच्या आत्ता याबाबत माफी मागावी. मी त्याच्या वडिलांसोबतही बोललो आहे. जर त्यानं माफी मागितली नाही. तर त्याच्या कानाखाली आवाज काढून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं जाईल. यापुढे जर अलिबागबद्दल अशी आक्षेपार्ह वक्तव्य केली गेली तर  तुमचं एकही चित्रीकरण करु दिलं जाणार नाही. यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी तुमची गाठ आहे.”असा इशारा अमेय खोपकर यांनी आदित्यला दिला होता.


हे हि वाचा – HBD: सेटवर Big B समोर बेशुद्ध पडला होता करण जोहर, वाचा किस्सा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -