घरमनोरंजनलॉकडाऊनमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे झाले असे हाल; व्हिडीओ बघून तुम्ही व्हाल हैराण!

लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे झाले असे हाल; व्हिडीओ बघून तुम्ही व्हाल हैराण!

Subscribe

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय...

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाल्याचे दिसते. यावेळी अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने स्वतःचे असे काही हाल केले आहे की तुम्ही देखील बघून हैराण व्हाल. उर्वशी रौतेलाने हा व्हिडीओ शेअर करताना असे लिहीले की, ‘माझा क्वारंटाईन माझ्या केसांसोबत…’ या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांसह नेटकरी चांगल्याच प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ उर्वशी तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

- Advertisement -

उर्वशी रौतेलाने व्हिडीओ शेअर करताना तिचे इंस्टाग्रामवर २५ मीलियन फॉलोवर्स झाल्याचे देखील सांगितले आहे. उर्वशी रौतेला आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टसाठी लाखों रूपये चार्ज घेत असल्याने ती सर्वांत महागडी अभिनेत्री असल्याच्या चर्चा होत आहे. उर्वशी रौतेला ही दुबईची Brand Ambassador देखील आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती एका स्विमींग पूलमध्ये धम्माल करताना दिसली होती. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला होता.

- Advertisement -

कोण आहे उर्वशी रौतेला?

उर्वशी रौतेला २०१५ मध्ये मिस इंडिया या स्पर्धेत जिंकली होती. त्याच वर्षी तिने मिस दिवा हा पुरस्कारदेखील जिंकला. सिंग साहब दी ग्रेट या चित्रपटातून २०१३ मध्ये तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने सनम रे, ग्रेट ग्रँड मस्ती, काबील आणि हेट स्टोरी ४ मधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यो यो हनी सिंगच्या अल्बममध्येदेखील उर्वशीने काम केले असून तिची अदा त्यावेळी चाहत्यांना खूपच आवडली होती. तसेच रेस ३ मध्ये तिचा गेस्ट अपिरिअन्स असल्याची चर्चा असून सध्या तिने आपल्या कोणत्याही बॉलीवूड प्रोजेक्टबद्दल सांगितलेलं नाही. मात्र सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाचे बरेच फॉलोअर्स आहेत. आपल्या इंस्टाग्रामवर उर्वशी नेहमीच आपले फोटो पोस्ट करत असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -